Ballia Accident: बिहार मधील बलिया (Ballia) येथे मंगळवारी रात्री बिहार स्पेशल आर्म्स पोलिस कर्मचाऱ्यांनी (Bihar Special Arms Police Personnel) भरलेल्या बसला अपघात (Bus Accident) झाला. या अपघातात बिहार पोलिसांचे (Bihar Police) 29 कर्मचारी जखमी झाले आहेत. 10 पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. बलिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी आणि छठ सणादरम्यान शांतता राखण्यासाठी मंगळवारी सैनिक डेहरीहून सोन रोहतास येथून सिवान बिहारला एका खासगी बसमध्ये जात होते. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास बैरिया भागातील चांद दियार पेट्रोल पंपाच्या बाहेर येताच बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि उलटली. या अपघातात 29 पोलिस कर्मचारी जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच बलिया पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी 29 कर्मचाऱ्यांना सीएचसी सोनबरसा येथे उपचारासाठी नेले. तेथून 10 जवानांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित जवानांवर सोनबरसा सीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत. (हेही वाचा -Jammu and Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरल्याने अपघात; एक सैनिक ठार, 9 जण जखमी)
एसपी विक्रांत वीर यांनी जखमी जवानांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एसपी विक्रांत वीर यांनी सांगितले की, 29 ऑक्टोबर रोजी बिहार स्पेशल आर्म्स पोलिसांची 18 वी बटालियन ई कंपनीच्या खासगी बसने रोहतासवरून देहरीहून जात होती. बैरिया भागातील चांद दियार पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. ज्यामध्ये 29 जवान जखमी झाले आहेत. सुमारे 2 तासांच्या बचावकार्यानंतर सर्व पोलिसांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना सामुदायिक आरोग्य केंद्र सोनबरसा येथे नेण्यात आले. (हेही वाचा - Himachal Pradesh Accident: हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये कार दरीत कोसळली; पाच जणांचा मृत्यू)
बिहारमधील बलिया येथे पोलिसांच्या बसला भीषण अपघात, पहा व्हिडिओ -
VIDEO | Visuals from accident site of Bihar Special Arms Police bus that happened last night in Ballia, Uttar Pradesh. pic.twitter.com/etF0GChp1R
— Press Trust of India (@PTI_News) October 30, 2024
याठिकाणी डॉक्टरांनी 10 गंभीर जखमी पोलिसांना प्राथमिक उपचार करून चांगल्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.