Jammu and Kashmir Accident: शुक्रवारी, 25 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) च्या कुलगाम जिल्ह्यात (Kulgam District) लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून उलटल्याने एक सैनिक ठार झाला असून इतर नऊ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, 25 ऑक्टोबर रोजी रात्री कुलगाम जिल्ह्यात ऑपरेशनल हालचाली दरम्यान भारतीय लष्कराचे एक वाहन घसरले आणि उलटले. दुर्दैवाने, या अपघातात एका शिपाईला आपला जीव गमवावा लागला. या अपघातात काही सैनिक जखमी झाले असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व सैनिकांची प्रकृती स्थिर असल्याचं भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्सवरील एका पोस्टमध्ये सांगितलं आहे. (हेही वाचा - Jammu and Kashmir: अपघातात जखमी झालेल्या सीआरपीएफ जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू)
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरल्याने अपघात -
On 25 Oct 24 night, during an operational move in #Kulgam district, a vehicle of #IndianArmy skid and overturned. Tragically, one sepoy lost his life, while few soldiers sustained injuries who were promptly evacuated for medical care. All soldiers are stable. #IndianArmy… pic.twitter.com/nCeYNw4UDu
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) October 26, 2024
गुरुवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील शुभम कुमार या मजुराला गोळ्या घालून जखमी केले होते. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील स्थलांतरित मजुरांवर झालेला हा तिसरा हल्ला होता. 18 ऑक्टोबर रोजी बिहारमधील मजूर अशोक कुमार चौहान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रविवारी 20 ऑक्टोबर रोजी गांदरबलमध्ये इन्फ्रा कंपनीच्या कामगारांच्या कॅम्पवर हल्ला झाला.