
IND vs OMA, Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मध्ये आज भारत आणि ओमान हे संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत दमदार कामगिरी करत आपले दोन्ही ग्रुप सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दुसरीकडे, ओमान संघाने अजून एकही विजय मिळवलेला नाही. ओमानसाठी हा सामना एक चांगला अनुभव ठरू शकतो. विशेष म्हणजे, ओमान संघाचा कर्णधार जतिंदर हा भारतीय वंशाचा आहे. IND vs OMA Weather Report: सामन्यादरम्यान अबू धाबीमध्ये हवामान कसे असेल? खेळाडूंना करावा लागेल या आव्हानाचा सामना
कोणाचे पारडे जड?
या सामन्यात भारताचे पारडे स्पष्टपणे जड आहे. आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. जर ओमानने हा सामना जिंकला, तर तो आशिया कपमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर ठरेल.
कधी आणि कुठे होणार सामना?
हा सामना १९ सप्टेंबर २०२५ रोजी अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळवला जाईल. येथील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते, त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
सामन्याची वेळ
- भारतीय वेळेनुसार (IST): रात्री ८:०० वाजता
- स्थानिक वेळेनुसार: संध्याकाळी ६:३० वाजता
- टॉसची वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?
भारतामध्ये या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. ऑनलाइन पाहण्यासाठी चाहते सोनी लिव्ह (SonyLIV) ॲप आणि वेबसाइटचा वापर करू शकतात.
सामना मोफत पाहता येईल का?
तुम्हाला हा सामना मोफत पाहण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत. एअरटेल आणि जिओच्या काही निवडक रिचार्ज प्लॅनमध्ये सोनी लिव्हचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. तुमचा रिचार्ज प्लॅन कोणता आहे, यावर हे अवलंबून असेल.