भारतामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांनी यामध्ये जीव गमावला आहे. नुकतीच Wagh Bakri Tea Group चे पराग देसाई यांचाही जीव भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याने डोक्यावर आपडून उपचारादरम्यान ब्रेन हॅमरेजने गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकदा डिलेव्हरी बॉईजना या भटक्या कुत्र्यांची दहशत असते. पण आजकाल हा भटक्या कुत्र्यांचा त्रास नेमका वाढला कसा? भटके कुत्रे असे अचानक हल्ले का करतात? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर जाणून घ्या यामागे नेमकं काय आहे?
भटके कुत्रे अचानक घोळक्याने येतात आणि अनेकदा रोजच्या लोकांवरही अचानक भूंकतात. त्यामुळे अनोळखी प्रमाणे अनेक सोसायट्यांमध्ये ओळखीच्या लोकांच्याही मनात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे.
भारताची लोकसंख्या 1.4 बिलियन वर पोहचली आहे. त्यामुळे सहाजिकच कमी जागेत आता खूप लोकं राहतात. अनेक रिपोर्ट्समधून समोर आलेल्या गोष्टींमध्ये दाटीवाटीने वाढणारी लोकसंख्या आणि गर्दी यामुळे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. भारतामध्ये प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम यंत्रणा देखील नाही. लोकसंख्येचा होत असलेला स्फोट आणि त्यामुळे प्राणी-मानव यांच्यात वाढत असलेला संघर्ष यामुळे स्थिती बिकट होत आहे. अन्न न मिळाल्याने आणि काहींमध्ये विशिष्ट संसर्गामुळेही कुत्रे हिंसक होतात.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची समस्या
रिपोर्ट्स पाहता भारतात पाळीव कुत्र्यांची संख्या 1 कोटी आहे तर भटक्या कुत्र्यांची संख्या 3.5 कोटी आहे. The National Crime Records Bureau data नुसार, 4146 जणांनी 2019 मध्ये कुत्र्याने चावा घेतल्याने जीव गमावला आहे. तर 2019 पासून कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या 1.5 कोटी वर गेल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वाधिक भटके कुत्रे उत्तर प्रदेशामध्ये आहेत. त्यांची संख्या 27.52 लाख आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू मध्ये 20.7 लाख आणि महाराष्ट्रात 15.75 लाख आहे.
हल्ल्याला जबाबदार कोण?
कुत्र्यांना वेडसरपणा, दुखापत, चिंता, ट्रॉमा असल्यास किंवा पिल्लांचं रक्षण करताना ते हिंसक होऊ शकतात. लोकांची वैयक्तिक त्यांच्याप्रति असलेली उदासिनता, सरकारचं दुर्लक्ष आणि प्राणीप्रेमी संघटनांची अपुरी संख्या ही कारणं देखील कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या मागे असू शकतात. 'Aadhaar Card' for Stray Dogs: Mumbai Airport वर 20 भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात QR Code Tags सह ‘Aadhaar’ कार्ड .
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अॅनिमल वेल्फेअर संस्था आणि नागरी समाज गटांचा दृष्टिकोन देखील कुत्र्यांच्या प्रति उदासीन आणि दुर्लक्षित राहिला आहे. भटक्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्या काही मूठभर व्यक्तींना अनेकदा उपहास आणि प्रतिकार सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचं वेळच्या वेळी लसीकरण होऊ शकत नाही. त्यामधून अनेक समस्या निर्माण होत आहेत.
भटक्या कुत्र्यांबद्दल कायदा काय सांगतो?
कायद्यानुसार कुत्र्यांना रस्त्यावर राहण्यापासून कुणी रोखू शकत नाही. त्यांना रस्त्यावरून हटवणं, इतरत्र हलवणं बेकायदेशीर आहे. जर कुणी त्याला दत्तक घेत नाही तर त्याला रस्त्यावर राहण्याचा हक्क आहे. 2001 पासून भटक्या कुत्र्यांना मारणं यावर बंदी आहे. 2008 मध्ये त्रास देणार्या कुत्र्यांना मारण्याची पालिकेची मुभा जी मुंबई उच्च न्यायालयाने दिली होती ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A(G) मध्ये म्हटले आहे, "वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि सर्व सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे."
कोणत्याही सोसायटीच्या आत किंवा बाहेरही भटक्या कुत्र्यांना खायला देणं ही बाब कायदेशीर आहे. रहिवाशी भागात असलेला कुत्रा तेथून हटवला जाऊ शकत नाही. त्रास असल्यास महापालिकेशी, एनजीओशी संपर्क साधून त्या कुत्र्याची नसबंदी केली जाऊ शकते पण त्यानंतर तो कुत्रा पुन्हा होत्या त्या जागीच पाठवला जातो.