मुंबईच्या विमानतळावर 20 भटक्या कुत्र्यांना शनिवार (15 जुलै) दिवशी आयडी कार्ड्स देण्यात आली. ही 'आधार' कार्ड्स त्यांच्या गळ्यात बांधण्यात आली असून त्यावर क्यू आर कोड्स (QR Codes) देखील आहेत. जी स्कॅन केल्यानंतर कुत्र्यांची माहिती समोर येत आहे ज्यात त्याचे नाव, फीडरचा कॉन्टॅक नंबर, Immunisation, Sterilisation यांची माहिती दिसते. जर कुत्रा हरवला तर ही माहिती मदतीची ठरू शकेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार येथे, BMC ने टर्मिनल 1 च्या बाहेर कुत्र्यांचे लसीकरण केले आहे.
सायन स्थित एका इंजिनियरने कुत्र्यांसाठी Distinctive Identification Tags तयार केले आहेत. या प्रोजेक्टचे नाव "pawfriend.in,"ठेवण्यात आले होते. सकाळी 8.30 पासून स्वयंसेवकांनी ही मोहीम सुरू केली होती. यामध्ये कुत्र्यांना पकडून त्यांना व्हॅक्सिनेट करणं, क्यू आर कोड टॅग्स लावणं ही प्रक्रिया करण्यात आली होती. जर कधी हे कुत्रे भरकटले तर त्यांचा शोध घेणं यामुळे सुकर होणार आहे. सोबतच बीएमसीला देखील याच्या माध्यमातून शहरातील भटक्या कुत्र्यांची माहिती ठेवणं सोप्प होणार आहे.
वांद्रे स्थित सोनिया शेलार या रस्त्यावरील 300 भटक्या कुत्र्यांना खाऊ घालतात. बीएमसीने या मोहिमेत त्यांनाही सहभागी करून घेतलं होतं. TOI च्या रिपोर्ट्स नुसार त्या कुत्र्यांना एकत्र करायला मदत करत होत्या. यामुळे बीएमसीच्या पशुवैद्यकाला त्याला शॉट देणं, टॅग बांधणं ही कामं सोप्प होत होती. नक्की वाचा: भिवंडी येथे भटके कुत्रे मोकाट, एकाच दिवशी दहा मुलांना चावल्याने परिसरात भीतीचे वातावरण .
बीएमसीच्या पशुवैद्यकीय आरोग्य सेवेचे संचालक Dr Kalim Pathan यांच्यामते, कुत्र्यांना देखील लसीकरण आणि प्राथमिक आरोग्य तपासणी मध्ये मदत केली. ते म्हणाले की त्यांनी पकडलेल्या प्रत्येक कुत्र्याची नसबंदी करण्यात आली आहे. विमानतळाबाहेर कुत्र्यांसाठी करण्यात आलेले QR कोड टॅगिंग हे एक प्रोटोटाइप ऑपरेशन असल्याचेही त्यांनी नमूद केले.