Coronavirus & Global Economy: चीन (China) देशात पहिल्यांदा आढळून आलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) आता जगभरातील अनेक देशांमध्ये पाय पसरु लागला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन मृत्यू होण्याची संख्या चीनमध्ये झपाट्याने वाढत आहे. इतकेच नव्हे तर जगभरातील इतरही देशांमध्ये या व्हायरसची लागण होऊन नागरिकांचे मृत्यू झाल्याचे घटना घडल्या आहेत. त्यामुळे जगभरातील नागरी जीवनावर कोराना व्हायरस परिणामकारक ठरतोच आहे. परंतू जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवरही कोरोना व्हायरस नकारात्मक प्रभाव (Coronavirus Impact) टाकू शकते असा इशारा अभ्यासकांकडून दिला जाऊ लागला आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर नेमका किती परिणाम होऊ शकतो? याबाबत निश्चित आकडा समोर आला नाही. परंतू, या व्हायरसमुळे चीनी अर्थव्यवस्था (Chinese Economy) मोठ्या प्रमाणावर संकटात सापडू शकते. इतकेच नव्हे तर, चीनी अर्थिव्यवस्था संकटात आल्यास त्याचा नकारात्मक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सध्या जगभराच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला टक्कर देईल इतकी मजबूत किंबहूणा जगात पहिल्या क्रमांकावर म्हणून ओळखली जाऊ शकते अशी चीनची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे चीनी अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या परिणामामुळे चीनी अर्थव्यवस्था अपेक्षीत विकास दर गाठू शकली नाही तर, जगभराती अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन मंदीसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते. भारत तर अगोदरपासूनच आर्थिक मंदीसदृश्य स्थितीचा सामना करत आहे. भारतही येत्या काळातील उभरती अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. त्यामुळे एकाच वेळी चीन आणि भारत अशा दोन महाकाय देशात आर्थव्यवस्थेमध्ये समस्या निर्माण होणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरु शकते.
अशा प्रकारच्या अपत्तींचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याची उदाहरणे या आधीही घडली आहेत. सन 2002-2003 मध्ये चीनमध्ये सीवियर एक्यूट रेसपेरेट्री सिंड्रोम म्हणजेच सार्सने भयंकर आव्हान निर्माण केले होते. त्याचा चीनी अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला होता. एका अहवालानुसार सार्स या भयानक आजारामुळे चीनी अर्थव्यवस्थेत विकास दर 1.1 वरुन 2.6 पॉइंट पर्यंत परिणामकारक ठरला होता. कोरोना व्हायरस जर सार्सइतकाच महाभयानक ठरला तर, चीन पुन्हा एकदा आर्थिक गर्तेत सापडू शकतो. असे घडले तर जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. (हेही वाचा, Coronavirus: चीन, अमेरिका, जपान, भारतासह जगभरातील 30 देशांमध्ये वाढला कोरोना व्हायरसचा धोका)
कोरोना व्हायरसचा चीनी शेअर बाजारावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे. हा परिणाम दृश्य रुपात पाहायला मिळत आहे. चीनच्या शेन्जेन आणि शंघाई स्टॉक मार्केटमध्ये 3.52 आणि 2.75 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. चीनमध्ये नव्या वर्षाची सुट्टी साजरी केली जात आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम पडत असल्यामुळे हा परिणाम टाळण्यासाठी सरकारने ही सुट्टी आणखी काही दिवस वाढवली आहे.