Risk Of Coronavirus: कोरोना व्हायरस (Coronavirus) हा भारताचा शेजारी चीन (China) देशाची डोकेदुखी बनला आहे. केवळ चीनच नव्हे तर भारतासह जगभरातील तब्बल 30 देश कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहेत. या व्हायरससचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा चीनमध्ये आहे. पण आता तो जगभरातील इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 132 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चीनशिवाय इतर देशांमध्येही नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. अभ्यासकांनी 30 देशांची यादी तयार केली आहे. ज्या देशांमध्यो कोरोना व्हायरसची नागरिकांना लागण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोना व्हायरसची लागण चीननंतर थाईलैंड, जपान आणि हाँगकाँग या देशात सर्वाधिक झाल्याचे पाहायला मिळते. अभ्यासकांच्या निष्कर्षामध्ये कोरोना व्हायरस झालेल्या देशांच्या यादीमध्ये अमेरिका सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 10 व्या, यूके 17 व्या तर भारत 23 व्या क्रमांकावर आहे. साउथेम्प्टन विद्यापीठातील वर्ल्डपॉप टीमच्या एका अहवालामध्ये म्हटले आहे की, सध्या कोरोना व्हायरसची लागण सर्वाधिक प्रमाणात बँकॉक शहरात पाहायला मिळते. या शहाराला या व्हायरसचा प्रचंड धोका असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, हा अहवाल बँकॉक शहरातून सर्वाधिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरुन हा अहवाल बनविण्यात आला आहे.
दरम्यान, इतर 30 प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये हाँगकाँग त्यानंतर ताइपेई (तैवान), सिडनी 12 , न्यूयॉर्क 16, लंडन 19 व्या क्रमांकावर आहे. साउथेम्प्टन विद्यापीठाच्या शेंगजेई लाई यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आम्ही परिस्थिती नियंक्षत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि परिस्थितीवर बारीक लक्षही ठेऊन आहोत. (हेही वाचा, Coronavirus ची लागण चीन पाठोपाठ जपान आणि अमेरिका पर्यंत पोहचली; जाणून या आजारा विषयी खास माहिती)
कोरोना व्हायरस संसर्ग होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या आतापर्य 132 वर पोहोचली आहे. तर, तब्बल 6 हजार लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, मंगळवारपर्यंत 31 स्थानिक प्रदेशात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळले असून त्यांची संख्या 5,974 इतकी आहे. या सर्वांवर निमोनिया आजारांवर केले जाणारे उपचार सुरु आहेत. वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार या आजारामुळे मृत्यू झालेलया रुग्णांची संख्या 132 इतकी झाली आहे.