Cigarette Butt: सिगारेटचे थोटूक ठरले 55 हजार रुपयांच्या दंडाचे कारण, घ्या जाणून
Cigarette Butt | Representational Image (Photo Credits: Pixabay)

धुम्रपाण ?(Smoking) रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. तरीदेखील धुम्रपाण करणाऱ्यांची संख्या जगभरात मोठी आहे. धुम्रपाण करणाऱ्या एका ब्रिटीश व्यक्तीला नुकताच 55,000 रुपयांपेक्षाही अधिक दंड ठोठावण्यात आला. सिगारेट प्यायल्यावर थोटके (Cigarette Butt) रस्त्यावरच टाकल्याने सदर व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. प्लॅस्टिक प्रदुषण नियमांचे उल्लंघन केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

मेट्रो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अॅलेक्स डेव्हिस (Alex Davis) असे आरोपीचे नाव आहे. सिगारेट ओढल्यावर (प्यायल्यावर) त्याने शिल्लख राहिलेली थोटके रस्त्यावरच टाकली. त्याचे हे वर्तन रस्त्यावरील अंमलबजावणी पाहिले. त्याच्या कृत्याबद्दल त्याला हटकले सुद्धा. परंतू, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी कचरा टाकल्याबद्दल त्याला निश्चित दंडाची नोटीस मिळाली. त्याने आपली सिगारेट थॉर्नबरी, ग्लुसेस्टरशायर येथे 20 मीटर अंतरावर कौन्सिल अधिकार्‍यांच्या समोर टाकली आणि तो तिथून निघून गेला. (हेही वाचा, Single Cigarette Ban: देशात सिंगल सिगरेटच्या विक्रीवर येणार बॅन? संसदीय स्थायी समितीचा विशेष प्रस्ताव)

आरोपी व्यक्तीला सुरुवातीला 15,000 रुपये दंड भरण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्याने आदेशाचे पालन केले नाही. त्यानंतर त्याला एकूण ₹ 55,603 च्या पीडित अधिभारासह दंड भरण्याचे आदेश देण्यात आले.

पर्यावरण अंमलबजावणी विभागाचे दक्षिण ग्लुसेस्टरशायर कौन्सिलचे कॅबिनेट सदस्य, कौन्सिलर रॅचेल हंट म्हणाले.सिगारेटची थोटके धोकादायक असतात. त्यातील घटकांचे विघटन होण्यासाठी 18 महिने ते 10 वर्षे इतका कालावधी लागू शकतो. त्यामुळे आरोपीची कृती ही गंभीर बाब मानली गेली पाहिजे.

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) नुसार, सिगारेटचे थोटूक हे जगभरात सर्वात जास्त टाकून दिले जाणारा कचरा आहे. जो दरवर्षी अंदाजे 766.6 दशलक्ष किलोग्रॅम विषारी कचरा बनवते. हा एक समुद्रकिनाऱ्यांवरील सर्वात सामान्य प्लास्टिक कचरा देखील आहे, ज्यामुळे सागरी परिसंस्था मायक्रोप्लास्टिक्सच्या गळतीसाठी अधिक संवेदनशील बनतात.

दरवर्षी, तंबाखू उद्योग सहा ट्रिलियन सिगारेट्स तयार करतो. ज्याचे सेवन जगभरात एक अब्ज धूम्रपान करणारे लोक करतात. या सिगारेटमध्ये सेल्युलोज एसीटेट फायबर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मायक्रोप्लास्टिक्सपासून बनलेले फिल्टर असतात. अयोग्यरित्या विल्हेवाट लावल्यास, सिगारेटचे बुटके सूर्यप्रकाश आणि आर्द्रता यांसारख्या घटकांमुळे तुटतात आणि मायक्रोप्लास्टिक्स, जड धातू आणि इतर अनेक रसायने सोडतात, ज्यामुळे पर्यावरणातील आरोग्य आणि सेवांवर परिणाम होतो, असे अभ्यासक सांगतात.