Danish Siddique: भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या
Terrorists | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

आंतरराष्ट्रीय न्युज एजन्सीमध्ये काम करणारे भारतीय फोटो जर्नलिस्ट (photojournalist) दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची अफगाणिस्तानच्या (Afghanistan) कंधार (Kandahar) येथे हत्या करण्यात आली आहे. नुकताच अमेरिकेच्या सैन्याला अफगाणिस्तानातून बाहेर आणल्यानंतर सिद्दीकी हे कंधार येथे प्रांतातील परिस्थिती कव्हर करत होते. प्रांतातील स्पिन बोल्दक जिल्ह्यात तालिबानच्या (Talibaan) हल्ल्यात अफगाण सैन्याचे रिपोर्टिंग करत होते.  सिद्दीकीची हत्या कंधारच्या स्पिन बोल्दक जिल्ह्यात झाली. त्यात असेही म्हटले आहे की, त्याच घटनेत कंधारमधील अफगाण स्पेशल फोर्सेसचा कमांडर सेदिक करझाई ठार झाला आहे.

रॉयटर्ससाठी (Reuters)काम करणार्‍या आणि मुंबईत राहणारे सिद्दीकी यांना प्रतिष्ठित पुलित्झर ( Pulitzer Prize) पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. नुकतेच 1 जुलैला सिद्दीकी यांनी ट्विट केले होते की, सुरक्षित राहणे हे भाग्यच आहे. जेव्हा प्रवास करीत असलेल्या गाडीवर तालिबान्यांनी हल्ला केला तो प्रसंग आठवत होता. मी इतर विशेष सैन्यासमवेत हुम्वीला प्रवास करीत होतो, त्या ठिकाणीही कमीतकमी आरपीजी फेऱ्या आणि इतर शस्त्रांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. सुरक्षित राहून आरमार प्लेटच्या ओव्हरहेडवर आदळलेल्या एका रॉकेटचे दृश्य हस्तगत करणे माझे भाग्य होते. अशी प्रतिक्रिया त्यांना ट्विटमध्ये दिली होती.

या घटनेनंतर फरीद मामुंडझे यांनी, काल रात्री कंधार येथे मित्र दानिश सिद्दीकी यांच्या हत्येच्या बातमीचे दु:ख झाले. भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता अफगाण सुरक्षा दलात समाविष्ट होतो. काबूलला जाण्यापूर्वी 2 आठवड्यांपूर्वी मी त्याला भेटलो. त्यांचे कुटुंबालासाठी मी सांत्वना व्यक्त करतो. असे भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंडझे यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

दानिश सिद्दीकी यांनी दिल्लीच्या जामिया-मिलिया, इस्लामिया येथून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली होती. त्यांनी विद्यापीठातून एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून मास कम्युनिकेशनची पदवीही घेतली होती. 2010 मध्ये ते इंटर्न म्हणून रॉयटर्समध्ये दाखल झाले होते. अफगाणिस्तानातून सिद्दीकी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नियमितपणे फोटो पोस्ट करत होते. जिथे तालिबानची उपस्थिती अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांच्या सैन्याने माघार घेण्याच्या दरम्यान वाढवत आहे. या परिस्थितीचे ते दर्शन घडवून आणत होते.

या आठवड्यात भारताने सुमारे 50 मुत्सदी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे . कंदार आणि मजारमधील दूतावासांसह काबुलमध्ये भारताचे दूतावास आहे. तेथे 500 कर्मचारी तैनात आहेत. यापूर्वी हेरात व जलालाबाद येथील दोन दूतावासांचे कामकाज थांबले होते. गेल्या आठवड्यापासून कंधार शहरामध्ये आणि आजूबाजूला भयंकर लढाईचे वृत्त आहे. तालिबान्यांनी शहराजवळील काही महत्त्वाचे जिल्हे ताब्यात घेतले आहेत. राजधानीच्या बाहेरील भागात अनेक पोलिसांनी जिल्ह्यांमध्ये अफगाण दलांना पकडून ठेवले आहे.