निसर्गाचे अनेक रंग अजूनही आपल्या कल्पनेपलीकडचे आहेत. समुद्रात उसळणाऱ्या त्सुनामीच्या लाटा असोत की वाळवंटातील उष्णता असो, निसर्ग अनेक प्रकारे त्याचे चमत्कार दर्शवत असतो. आता रशियातील सायबेरियन (Siberia) प्रांतातदेखील असाच निसर्गाचा एक चमत्कार दिसून आला आहे. याठिकाणी एक 282 फूट खोल खड्डा आहे, जो जणूकाही आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी गिळंकृत करण्यास तयार आहे. लोक त्याला 'माउथ टू हेल' (Mouth to Hell) किंवा 'द वे टू अंडरवर्ल्ड' म्हणत आहेत. बटागाइका क्रेटर (Batagaika Crater) म्हणून ओळखले जाणारे हे विवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार झालेले एक रहस्यमय छिद्र आहे.
हा खड्डा प्रथम 1980 मध्ये मोजण्यात आला होता. तेव्हापासून या खड्ड्याची लांबी 1 किलोमीटरने वाढली असून खोली 96 मीटर म्हणजेच 282.1 फूट झाली आहे. या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून बाहेर पडणारी माती 1 लाख 20 हजार ते 2 लाख वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. खड्ड्याचा तळाचा थर साडेसहा लाख वर्षे जुना आहे. हे युरेशियातील सर्वात जुने खुले विवर आहे.
Siberia's Batagaika Crater is largest permafrost crater in the world: 1km long, caused by a warming climate, releasing methane
50% of Earth’s methane is stored in Northern Hemisphere permafrost which is melting at levels not expected until 2090, 150 to 240% above historic levels pic.twitter.com/dZUd7A1m1u
— Assaad Razzouk (@AssaadRazzouk) October 3, 2021
सायबेरियामध्ये 1980 मध्ये सर्वात प्रथम हा खड्डा निदर्शनास आला होता. तेव्हापासून त्याचा सतत वाढत जाणारा आकार पाहून लोक त्याला नरकाचे द्वार म्हणू लागले. तो ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने तो आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेत आहे. सध्या, त्याच्या वाढीचा वेग दरवर्षी 20 ते 30 मीटर आहे. हे थांबवता येणार नाही आणि अशीच वाढ होत राहिली तर लवकरच परिसरातील सर्व काही खड्ड्यात जाईल, असे सांगण्यात येत आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, हा खड्डा वाढण्याचे कारण म्हणजे इथल्या परिसरातील माती जवळजवळ 2 वर्षांपर्यंत अत्यंत कमी तापमानात राहिली आहे. सायबेरियातील तापमान शून्यापेक्षा खूप खाली राहिल्याने, इथल्या जमिनीतील ओलावा ही फार मोठी गोष्ट नाही. शास्त्रज्ञ सांगतात की, ही जी माती ढासळत आहे, ती 25 लाख वर्षांपूर्वी Quaternary Ice Age मध्ये गोठलेली असावी. (हेही वाचा: NASA: नासाने टीपलेला मंगळ ग्रहाचा फोटो पाहिलात का? पाहा आश्चर्यकारक दृश्य)
1960 मध्ये जेव्हा येथील जंगले साफ केली गेली तेव्हा या पृष्ठभागाला उष्णता आणि सूर्यप्रकाश मिळाला, ज्यामुळे हा परिसर ढासळू लागला. हे पर्यावरणासाठी अजिबात चांगले नाही कारण ते धोकादायक हरितगृह वायू सोडते, ज्यामुळे तापमान वाढू शकते. असे मानले जाते की, अशाच कारणांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग वाढले आहे आणि परिणामी नरकाचे असे आणखी दरवाजे जगात वेगवेगळ्या ठिकाणी दिसू शकतात.