Tulsi Vivah 2025 Wishes in Marathi for Husband

Tulsi Vivah 2025 Wishes in Marathi for Husband: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते. असे म्हटलं जात की ज्या घरात तुळशीवर जल अर्पण केले जाते त्या घरात नेहमी सुख-समृद्धी राहते. याशिवाय संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे देखील खूप फलदायी मानले जाते. तुळशीजवळ दिवा लावल्याने घरात लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. विशेषत: कार्तिक महिन्यात तुळशीपूजेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिना भगवान नारायणांना अतिशय प्रिय आहे. हे देखील वाचा: Tulsi Vivah 2025 Invitation Card: तुळशीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका WhatsApp Messages, Images द्वारा देत आप्तांना द्या निमंत्रण

तुळशी विवाह निमित्त तुमच्या पतीला द्या शुभेच्छा

तुळशी विवाहाचा सणही याच महिन्यात येतो. अशा स्थितीत या महिन्यात भगवान विष्णूसोबत तुळशी मातेची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक लाभ होतो. यंदा तुळशीचं लग्न (Tulsi Vivah) २ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. तुळशी विवाह निमित्त तुमच्या पतीला Messages, Wishes, Whatsapp Status, SMS द्वारे मंगलमय दिवसाच्या खास शुभेच्छा देऊ शकता.

"तुझ्यासोबत प्रत्येक क्षण खास असतो,

आज तुळशी विवाहाच्या या शुभ मुहूर्तावर

आपले प्रेम असेच वाढत राहो

तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!"

"या पवित्र दिवशी,

तुळशी आणि श्रीकृष्णाच्या विवाहाप्रमाणे,

आपले नाते अधिक घट्ट आणि सुंदर व्हावे,

हीच सदिच्छा

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!"

"माझ्या प्रिय पतीला तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपला संसार सदैव सुखाने आणि समृद्धीने भरलेला राहो."

तुळशीचं लग्न लावणार्‍या व्यक्तीला या व्रताच्या माध्यमातून कन्यादान केल्याचं पुण्य मिळतं. अशी धारणा आहे. तर काहींच्या धारणेनुसार तुळशी विवाहाच्या व्रतामुळे घरातील कन्येला कृष्णाप्रमाणे वर मिळण्यास मदत होते. त्यामुळेही तुळशीची लग्नं जोरात पार पाडली जातात. तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह केला जातो. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा तुळशीशी लग्न लावले जाते. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.