tulsi vivah invitation card

Tulsi Vivah 2025 Invitation Card: दिवाळीची धामधूम महाराष्ट्रात तुळशीच्या लग्नापर्यंत सुरू असते. यंदा तुळशीचं लग्न (Tulsi Vivah) २ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. दारात तुळशीचं लग्न लावून मग घरातील मंगलकार्यांना सुरूवात केली जाते. कार्तिकी द्वादशी पासून पौर्णीमेपर्यंत तुळशीची लग्न लावली जाऊ शकतात. यावेळी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांनी होईल. याचा समारोप ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५ वाजून ०७ मिनिटांनी होईल. त्यामुळे यावर्षी तुळशी विवाह २ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी केला जाईल. या दिवशी घरोघरी विशेष पूजन, व्रत आणि विवाह विधी केले जातात. मग यंदा तुमच्याकडेही तुळशीच्या लग्नाचा बार उडणार असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आप्तेष्टांना खास आमंत्रण देऊन निमंत्रित करू शकता.

कुर्यात सदा मंगलम!

आमच्या येथे ०२ नोव्हेंबर दिवशी सायंकाळी ५.३५ च्या मुहूर्तावर तुलसीविवाह संपन्न होणार आहे, तरीही आपण यंदा उपस्थिती लावावी हे अगत्याचं आमंत्रण!

आमच्या तुळशीच्या लग्नाला नक्की या!

विवाह तारीख - ०२ नोव्हेंबर / रविवार

विवाह मुहूर्त- सायंकाळी ५.३५

आज ०२ नोव्हेंबर आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं...

वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता

लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे!

॥ तुळशी विवाह ॥

चि. विष्णू आणि चि.सौ.का. तुळशी

यांचा विवाहसोहळा आमच्या घरी रविवारी, ०२ नोव्हेंबर २०२५ दिवशी आयोजित केला आहे. सायंकाळी ५.३५ वाजण्याच्या शुभमुहूर्तावर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

कुर्यात सदा मंगलम!

आमच्या येथे ०२ नोव्हेंबर दिवशी सायंकाळी ५.३५ च्या मुहूर्तावर तुलशी विवाह संपन्न होणार आहे, तरीही आपण यंदाही आपल्या उपस्थितीसाठी हे अगत्याचं आमंत्रण!

आमच्या तुळशीच्या लग्नाला नक्की या!

विवाह तारीख - ०२, नोव्हेंबर

विवाह मुहूर्त- सायंकाळी ५.३५

तुळशीचं लग्न लावणार्‍या व्यक्तीला या व्रताच्या माध्यमातून कन्यादान केल्याचं पुण्य मिळतं. अशी धारणा आहे. तर काहींच्या धारणेनुसार तुळशी विवाहाच्या व्रतामुळे घरातील कन्येला कृष्णाप्रमाणे वर मिळण्यास मदत होते. त्यामुळेही तुळशीची लग्नं जोरात पार पाडली जातात. तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह केला जातो. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा तुळशीशी लग्न लावले जाते. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.