Photo Credit - AI

घरेलू क्रिकेटच्या संदर्भात बोलायचं झाल्यास, मुंबईचा विक्रम सर्वात जोरदार आहे आणि यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे त्यांच्या खेळाडूंचा दृष्टिकोन. मुंबईकडे इतके टॅलेंट होते की, भारताच्या कसोटी संघात मुंबईचे ५-६ खेळाडू खेळणे ही सामान्य गोष्ट होती. असे म्हटले जायचे की, भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यापेक्षा मुंबईच्या संघात स्थान मिळवणे अधिक कठीण आहे. एक जरी सामना खेळला नाही, तर दुसरा खेळाडू इतका चांगला खेळायचा की संघातली जागा धोक्यात यायची. सध्या अनेक खेळाडू लग्नाच्या निमित्ताने सामने/मालिका टाळतात, पण मुंबईच्या एका खेळाडूने तर आपली जागा जाईल या भीतीने चक्क लग्नाचा दिवस देखील सोडला नाही!

लग्नाच्या दिवशी शतक

हा मजेदार आणि अविश्वसनीय किस्सा आहे सलामीवीर फलंदाज सुधाकर अधिकारी (Sudhakar Adhikari) यांचा. ते भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यास पात्र होते, असे अनेक क्रिकेट जाणकार आजही मानतात. अधिकारी यांच्या नावाशी जोडलेला सर्वात प्रसिद्ध किस्सा म्हणजे, लग्नाच्या दिवशीही रणजी ट्रॉफीचा सामना खेळणे आणि वेळेत ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) पोहोचणे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @marathi_mood

ब्रेबॉर्नपर्यंत धावपळ

१९६० च्या दशकात बॉम्बे क्रिकेटमध्ये खेळाडूंमध्ये एवढी स्पर्धा होती की सुधाकर अधिकारींसारखा यांच्यासारखा अनुभवी फलंदाज देखील लग्नाच्या दिवशी हा लीग राऊंडचा सामना खेळायला मैदानावर उतरले. आणि शतक पुर्ण केले. "त्या काळात संघात जागा टिकवणे ही तारेवरची कसरत होती. जर मी सामना टाळला असता, तर दुसऱ्या खेळाडूला संधी मिळाली असती आणि त्याने उत्तम कामगिरी, विशेषतः शतक ठोकल्यास, मला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागले असते."

सुधाकर अधिकारींची कारकीर्द

माजी क्रिकेटपटू सुधाकर अधिकारी यांनी १९५९ ते १९७१ या काळात मुंबई  क्रिकेट संघासाठी खेळले.

  • प्रथम श्रेणी सामने: ६५
  • एकूण धावा: ३,७७९
  • शतके: ११

महत्त्वपूर्ण कामगिरी

१९६२-६३ च्या इराणी करंडक (Irani Cup) सामन्यात, त्यांनी मुंबई संघाकडून ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेष भारताच्या (Rest of India) विरुद्ध १७३ धावांची शानदार खेळी केली होती.