Kartiki Ekadashi 2025 Wishes in Marathi: महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी प्रमाणे कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आषाढी एकादशी पासून सुरू झालेला चातुर्मास (Chaturmas) कार्तिकी एकादशीला संपतो. यंदा ही कार्तिकी एकादशी ०२ नोव्हेंबर म्हणजे आज साजरी केली जाणार आहे. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकर्यांचा पुन्हा मेळा रंगतो. विठूनामाचा गजर करत सारे पंढरपूरात दाखल होतात. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्र मंडळींना द्यायच्या असतील तर Wishes, Messages, Greetings, WhatsApp Status शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.
कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी सारे भक्त आसुसलेले असतात. ज्यांना कार्तिकीला पंढरपूरात जाणं शक्य नसतं ते भाविक जवळच्या विठ्ठल- रूक्मिणीच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेतात. या दिवशी काही जण एकदिवसीय व्रत करतात. कार्तिकी एकादशी नंतर द्वादशीपासून तुळशी विवाहाला सुरूवात होते. हिंदुधर्मीयांसाठी या दिवसापासून लगीनसराई सुरू होते.
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
कार्तिकी एकादशीच्या माऊली भक्तांना शुभेच्छा !
टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
कार्तिकी एकादशी च्या शुभेच्छा !
चला आळंदीला जाऊ ।
ज्ञानदेवा डोळा पाहु ।
कार्तिकी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा !
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा।
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा !
कार्तिकीचा सोहळा ।
चला जाऊ पाहू डोळा ||
आले वैकुंठ जवळा ।
सन्निध पंढरीये ।।
कार्तिकी एकादशीच्या
भक्तीमय शुभेच्छा !
कार्तिकी एकादशी ही देव उठनी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी विष्णू भगवान निद्रावस्थेमधून जागे होतात आणि पुन्हा कामाला सुरूवात करतात अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे.