NASA: नासाने टीपलेला मंगळ ग्रहाचा फोटो पाहिलात का? पाहा आश्चर्यकारक दृश्य
Mars | (Photo Credits: NASA )

नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस प्रशासन एडमिनिस्ट्रेशन अर्थात नासा (NASA) नेहमीच आंतराळातील विविध घडामोडींचे चित्रण, छायाचित्रे जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचवत असते. अनेकदा ही छायाचित्रे अनपेक्षीत आणि तितकीच धक्कादायक असतात. आताही नासाने असेच एक छायाचित्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. नासानेच दिलेल्या माहितीप्रमाणे हे छायाचित्र मंगळ ग्रहावरील एका क्रेटर (Mars crater) चे आहे. या छायाचित्राला शिर्षक देताना नासा म्हणते की, 'मार्टियन क्रेटर प्रसंगाला सूचीत करते आहे.'

नासाने मार्स टोरी ऑर्बिटरवर अत्युच्च रिजॉल्यूशन इमेजिंग सायन्स एक्सपेरिमेंट (HiRISE) चा वापर करत हे छायाचित्र टीपले आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या फॉलोअर्सना म्हटले आहे की, ते मंगळ ग्रहावर 0° देशांवर पाहात आहेत. जो लाल ग्रहावर ग्रीनविच वेधशाळेसमक्ष आहे. नासाने या छायाचित्राबाबत माहिती देताना म्हटले आहे की, नकाशा इथे 50 सेंटीमीटर (19.7 इंच) प्रति पिक्सेलवर आम्ही शेअर करत आहोत. इथे पाहा नासाचा मंगळ ग्रहाचा फोटो. (हेही वाचा, NASA करत आहे 24 धर्मगुरू व पुजाऱ्यांची नियुक्ती; एलियन्स शोधण्याच्या दिशेने मोठे पाऊल)

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

नासाने मंगळ ग्रहाचा फोटो शेअर करताच या पोस्टला 449,000 पेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. अेक इन्स्टाग्राम यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये भीतीही व्यक्त केली. एका यूजरने म्हटले आहे की, मंगळ ग्रहावर एलियनच्या पावलांच्या ठशांसारखे काहीतरी दिसत आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ईश्वर जगातील सर्वात सुंदर रचना करतो.