NASA करत आहे 24 धर्मगुरू व पुजाऱ्यांची नियुक्ती; एलियन्स शोधण्याच्या दिशेने मोठे पाऊल
NASA (Photo credits: PTI)

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA) अनेक दिवसांपासून एलियन्सच्या (Alien) अस्तित्वाचा शोध घेत आहे. याआधी यूएफओ आणि इतर ग्रहांवरील जीवांबाबत वेळोवेळी धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. मात्र, त्या दाव्यांची पुष्टी होऊ शकली नाही आणि नासाला अजूनतरी या मोहिमेत यश मिळू शकले नाही. आता नासा एलियन्सचा शोध घेण्याच्या आपल्या मिशनमध्ये काही धर्मगुरू आणि पुरोहितांचा (Priests) समावेश करणार आहे. हे पुजारी एलियन्सच्या संपर्कासाठी मानवतेला तयार करतील. नासाने एक योजना तयार केली आहे ज्या अंतर्गत 24 धर्मशास्त्रज्ञांची मदत घेतली जाईल.

स्पेस एजन्सीला हे जाणून घ्यायचे आहे की, जगातील विविध धर्म दुसर्‍या ग्रहावरील जीवनाच्या अहवालावर कशी प्रतिक्रिया देतील. ब्रिटीश धर्मगुरू डॉ अँड्र्यू डेव्हिसन हे देखील त्यापैकीच एक आहेत. पृथ्वीबाहेरील जीवन शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रगतीचा एक भाग म्हणून नासा धार्मिक तज्ञांची नियुक्ती करत आहे. दुसऱ्या ग्रहावरील जीवनाचा शोध पृथ्वीवरील देव आणि जीवनाच्या उत्पत्तीबद्दलच्या विचारांवर कसा परिणाम करू शकतो? या प्रश्नांचे उत्तर नासा शोधत आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटीश धर्मगुरू डॉ अँड्र्यू डेव्हिसन हे केंब्रिज विद्यापीठात धर्मशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट पदवी घेतली आहे. ते एक धर्मशास्त्रज्ञ असून, देवाचे स्वरूप, धर्म आणि धार्मिक विश्वासांबद्दल ते अभ्यास करतात. आता नासाकडून त्यांची नियुक्ती हा पुरावा आहे कीम नासा  एलियन्स शोधण्याच्या दिशेने वेगाने प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा: नासाचे अंतराळयान Parker Solar Probe ने केला सूर्याला स्पर्श; इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना)

दरम्यान, एका मेक्सिकन टोळीने अनेक दशकांपासून गुप्त अमेरिकन लष्करी तळाजवळ राहण्याचा त्यांचा 'भयानक अनुभव' कथन केला आहे. लोकांचा दावा आहे की या तळावर एलियन येत-जातात. एलियन स्थानिक लोकांच्या गायींचे अपहरण करतात आणि त्यांचे हातपाय कापतात असाही दावा केला जातो. हे लोक जवळपास 60 वर्षांपासून येथे राहत असून आता ते एलियनमुळे त्रस्त आहेत. ते म्हणतात की त्यांनी 'डल्स बेस'चे केंद्र मानले जाणाऱ्या डोंगराभोवती अनेकदा युएफओ पहिले आहेत. हे न्यू मेक्सिकोमध्ये डल्स शहराजवळ आहे.