NASA Creates History: नासाचे अंतराळयान Parker Solar Probe ने केला सूर्याला स्पर्श; इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना
Sun | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (National Aeronautics and Space Administration) च्या अंतराळयानाने सूर्याला (Sun) स्पर्श करून इतिहास रचला आहे. हा एक असा पराक्रम आहे जो अशक्य मानला जातो. इतिहासात पहिल्यांदाच एका अंतराळ यानाने सूर्याच्या कोरोनाला स्पर्श केला आहे, ज्याचे तापमान सुमारे 20 लाख डिग्री फॅरेनहाइट असते. सौर विज्ञान आणि अवकाशाच्या जगात नासाचे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. पार्कर सोलर प्रोब (Parker Solar Probe) असे या यानाचे नाव आहे.

गुरुवारी अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या बैठकीत नासाच्या शास्त्रज्ञांनी या नेत्रदीपक कामगिरीची घोषणा केली. पार्कर सोलर प्रोबने 28 एप्रिल रोजी सूर्याच्या वरच्या वातावरणात, कोरोनामध्ये यशस्वीपणे प्रवेश केला आणि उड्डाण केले. मग त्याने फायरबॉल (सूर्य) च्या पृष्ठभागावरील कण आणि चुंबकीय क्षेत्रांचे नमुने घेतले. हार्वर्ड आणि स्मिथसोनियन (CfA) येथील खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या सदस्यांसह इतर शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या मोठ्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले आहे.

या टीमने प्रोबमधील महत्त्वाच्या उपकरणाची 'सोलर प्रोब कप'ची निर्मिती केली आणि आता त्याची देखरेखदेखील हीच टीम करत आहे. हा कप एक असे उपकरण आहे जे सूर्याच्या वातावरणातील कण गोळा करण्याचे काम करत आहे, ज्यामुळेच सूर्याच्या वातावरणाच्या बाहेरील पृष्ठभाग असलेल्या 'कोरोना' पर्यंत पोहोचण्यात अंतराळयान यशस्वी झाले आहे, हे शास्त्रज्ञांना समजणे सोपे झाले. शास्त्रज्ञांनी सांगितले की त्यांना या प्रोबमधून मिळालेला डेटा मिळविण्यासाठी अनेक महिने लागले आणि त्यानंतर त्याची पुष्टी करण्यासाठी अनेक महिने लागले.

स्पेसक्राफ्टच्या कपमध्ये गोळा केलेल्या डेटावरून असे दिसून आले की 28 एप्रिल रोजी पार्कर प्रोबने सूर्याच्या वातावरणाची बाह्य पृष्ठभाग तीन वेळा ओलांडली. एकदा तर किमान पाच तास. सूर्याच्या वातावरणाचे, ज्याला कोरोना असेही म्हणतात, तापमान सुमारे 11 लाख अंश सेल्सिअस (सुमारे 20 दशलक्ष अंश फॅरेनहाइट) आहे. अशा उष्णतेमुळे पृथ्वीवर आढळणारे सर्व पदार्थ काही सेकंदात वितळू शकतात. म्हणूनच शास्त्रज्ञांनी अवकाशयानामध्ये विशेष तंत्रज्ञानाची उष्णता ढाल बसवली आहेत, जी लाखो अंश तापमानातही सूर्याच्या उष्णतेपासून अवकाशयानाचे संरक्षण करण्याचे काम करते.

नासाने 12 ऑगस्ट 2018 रोजी आपले पार्कर सोलर प्रोब अंतराळ यान प्रक्षेपित केले. हा नासाच्या 'लिव्हिंग विथ अ स्टार' कार्यक्रमाचा भाग आहे, ज्याद्वारे सूर्य-पृथ्वीच्या विविध पैलूंशी संबंधित माहिती समजून घेणे आणि संकलित करणे हे एजन्सीचे उद्दिष्ट आहे. नासाचे म्हणणे आहे की पार्कर प्रोबमधून मिळालेल्या माहितीमुळे सूर्याबद्दलची आमची समज आणखी विकसित होईल. (हेही वाचा: Anil Menon, भारतीय वंशाच्या अंतराळवीराचा NASA च्या Moon Mission मध्ये 10 अंतरावीरांमध्ये समावेश)

पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता देणार्‍या या तार्‍याबद्दल आतापर्यंत फारशी माहिती मिळालेली नाही. विशेषत: सूर्याच्या रचनेबाबत आतापर्यंत संशयाची स्थिती होती. अशा परिस्थितीत सूर्याशी संबंधित रहस्य उघडण्यासाठी पार्कर सोलर प्रोबचे सूर्याच्या वातावरणात पोहोचणे हो गोष्ट महत्त्वाची आहे.