Anil Menon, भारतीय वंशाच्या अंतराळवीराचा NASA च्या Moon Mission मध्ये 10 अंतरावीरांमध्ये समावेश
Astronauts Anil Menon. (Photo Credits: IANS)

भारतीय वंशाचा अनिल मेनन (Anil Menon)हा आता नासाने त्यांच्या आगामी चंद्रमोहिमेसाठी निवडला आहे. अनिल हा नासाच्या 10 अंतराळवीरांपैकी एक आहे. US Air Force मध्ये lieutenant colonel असणारा आणि SpaceX’s पहिला फ्लाईट सर्जन देखील ठरला आहे. अनिलचा जन्म अमेरिकेमध्ये Minneapolis च्या Minnesota मध्ये झाला आहे. त्याने भारतामध्ये Rotary Ambassadorial Scholar म्हणून पोलिओ लसीकरणाला सपोर्ट करण्यासाठी एक वर्ष भारतामध्येही काम केले आहे.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठी नासा मध्ये त्याने क्रु फ्लाईट सर्जन म्हणून देखील काम केले आहे. दरम्यान फिजिशिअन म्हणून त्याने 2010 च्या Haiti, 2015 च्या नेपाळ आणि 2011 च्या Reno Air Show accident मध्ये काम केले आहे.

नासा कडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अंतराळवीरांच्या यादी मध्ये 6 पुरूष आणि 4 महिलांचा समावेश आहे. याकरिता मार्च 2020 पासून आवेदनं मागवण्यात आली होती. त्याकरिता 12 हजारापेक्षा अधिकांनी अर्ज केला होता.नक्की वाचा: चुकीच्या माहितीच्या आधारावर झाली औरंगाबादच्या दीक्षा शिंदेची NASA पॅनलवर निवड; नासाच्या ईमेलमधून समोर आले धक्कादायक सत्य .

अनिल मेनन हा Harvard University मध्ये neurobiology शिकला. नंतर Huntington’s diseaseवर त्याने संशोधन देखील केलं आहे. Stanford Medical School मध्ये तो मेडिसिन आणि इंजिनियरिंग शिकला. कॅलिफॉर्नियामधील NASA Ames Research Center मध्ये त्याने कोडिंग सॉफ्ट टिश्यू वर काम केले. तर एरोस्पेस ट्रेनिंग मध्ये त्याला दोनदा US Air Force critical care air transport team ते जखमींवरील उपाय आणि ट्रान्सपोर्ट भागात दोनदा पाठवण्यात आलं होतं.

नासा फ्लाईट सर्जन म्हणून 2014 मध्ये काम सुरू केले. त्याने ISS मध्ये deputy crew surgeon म्हणून काम केले.