Katy Perry | X @ANI

पॉप गायिका केटी पेरी (Katy Perry) सह सहा महिलांनी अंतराळाची सफर करून जमिनीवर सुरक्षित लॅन्डिंग केले आहे. त्यांचा हा प्रवास अवघ्या 11 मिनिटांचा होता.त्यांच्या यानाने सर्वाधिक 2300 मिल प्रति तास या वेगाने प्रवास केला आहे. हा वेग ध्वनी च्या वेगाच्या तिप्पट आहे. केटी पेरी सोबत असलेल्या महिलांच्या टीम मध्ये गायिका, पत्रकार, वैज्ञानिक आणि फिल्म निर्मात्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. अमेरिकेत हे  उड्डाण स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता झाले.  पृथ्वीपासून सुमारे 100 किलोमीटर वर असलेल्या अवकाशाच्या सीमा म्हणजेच करमन रेषा ओलांडली आणि सुमारे तीन मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षणाचा (Zero Gravity) अनुभव घेतला. यानंतर पॅराशूटच्या मदतीने अंतराळयान टेक्सासच्या वाळवंटात सुरक्षितपणे उतरले.

सहा महिलांच्या या संपूर्ण टीमला जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिनने (Blue Origin Rocket) 'न्यू शेपर्ड रॉकेट' (New Shepard) द्वारे अंतराळात पाठवले होते.1963 नंतर पहिल्यांदाच महिलांच्या संपूर्ण टीमने अंतराळात प्रवास केला आहे. याआधी 1963 मध्ये रशियन अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा यांनी अंतराळ प्रवास केला होता.

उड्डाणाचा क्षण

ब्लू ओरिजिन ट्रिपमध्ये सहभागी महिला कोण?

ब्लू ओरिजिन ट्रिपमध्ये पॉप गायिका केटी पेरी, पत्रकार गेल किंग, नागरी हक्क वकील अमांडा इंगुएन, नासाच्या माजी रॉकेट शास्त्रज्ञ आयशा बोवे आणि चित्रपट निर्मात्या कॅरिन फ्लिन यांचा समावेश आहे. तिच्यासोबत सहावी महिला लॉरेन सांचेझ होती, जी गटाचे नेतृत्व करत होती. ती जेफ बेझोस यांची मैत्रीण आहे.

पृथ्वीवर परतल्यानंतर केटीने व्यक्त केली कृतज्ञता

ब्लू ओरिजिन ट्रिपमध्ये या सहा महिलांनी न्यू शेपर्ड-31 नावाच्या या मोहिमेवर ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटवरून प्रवास केला. त्यातील अंतराळयान पूर्णपणे स्वयंचलितपणे काम करू शकते. अमेरिकेतील पश्चिम टेक्सास येथील कंपनीच्या प्रक्षेपण केंद्रातून 14 एप्रिल रोजी न्यू शेपर्ड रॉकेट अवकाशात सोडण्यात आले.  First Indian Space Tourist: पायलट Gopi Thotakura ठरले पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय; Jeff Bezos यांच्या Blue Origin द्वारे करणार प्रवास (Video).

"ही फक्त एक अंतराळ मोहीम नाही. हे लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचे एक अभियान आहे," असे ब्लू ओरिजिनने एका निवेदनात म्हटले आहे.