Kartiki Ekadashi 2025 Messages: कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा विठू भक्तांना देण्यासाठी खास मराठमोळी Greetings, HD Images!

महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठूरायाची आणि रूक्मिणी मातेची खास पूजा केली जाते. एकादशीचं व्रत सांभाळत विठू भक्त विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात. पंढरपूरात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते.

Kartiki Ekadashi 2025 Messages: कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा विठू भक्तांना देण्यासाठी खास मराठमोळी Greetings, HD Images!
Kartiki Ekadashi 2025 Messages

Kartiki Ekadashi 2025 Messages: दिवाळी झाली की विठू भक्तांची कार्तिकी एकादशीसाठी (Kartiki Ekadashi) लगबग सुरू होते. यंदा ०२ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जात आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठूरायाची आणि रूक्मिणी मातेची खास पूजा केली जाते. एकादशीचं व्रत सांभाळत विठू भक्त विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात. पंढरपूरात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते. असा हा कार्तिकी एकादशीचा दिवस तुमच्या नातेवाईकांना, प्रियजणांना, आप्तेष्टांनाही खास करण्यासाठी डिजिटल मीडीयामध्ये तुम्ही कार्तिकी एकादशी निमित्त WhatsApp Messages, Status, Stickers, Wishes, Photos, HD Images शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.

विठ्ठल रूक्मिणीचं मंदिरं आकर्षक सजावटीने झगमगत 

आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी एकादशी निमित्त देखील पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणीचं मंदिरं आकर्षक सजावटीने झगमगत असतं. देवाची खास वस्त्र आणि अलंकाराने सजवून पूजा करण्याची रीत आहे. वारकरी मंडळी आणि भागवत संप्रदायातील मंडळी एकादशीचा एका दिवसाचा उपवास ठेवून आपली श्रद्धा विठूरायाच्या चरणी अर्पण करतात. मग हा दिवस तुमच्याही आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येवो ही कामना आहे.

पुढे परतूनी येऊ,

आता निरोप असावा जनी विठ्ठल दिसावा,

मनी विठ्ठल रूजावा डोळे मिटता सामोरे,

पंढरपूर हे साक्षात मन तृप्तीत भिजून,

पाही संतांचे मंदिर

प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

रूप पाहता लोचनी,

सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा,

तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी,

म्हणून विठ्ठले आवडी सर्व सुखांचे आगर,

बाप रखुमादेवी वर

कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा !

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,

उभी पंढरी आज नादावली,

तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी,

जीवाला तुझी आस का लागली

प्रबोधिनी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा !

भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले,

आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले,

तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे पांडुरंगा,

माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील विठ्ठल-रूक्मिणीची मंदिरं गर्दीने फुलून गेलेली असतात. वारकरी मंडळी पायी वारी करत, दिंड्या, पालख्या घेऊन पंढरपूरात दाखल होतो. या निमित्ताने अखंड हरिनाम सुरू असतो. गाव खेड्यात विठ्ठल नामस्मरणात तल्लीन होत अभंग, भजनं गायली जातात.

(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2025 09:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).