Samsung कंपनीने लॉन्च केला Galaxy S20+ BTS Edition, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Galaxy S20+ 5G BTS Edition (Photo Credits-Twitter)

सॅमसंग कंपनीकडून Galaxy S20+ आणि Samsung Galaxy S20+ 5G BTS Edition लॉन्च करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग यांनी गॅलेक्सी बड्स प्लस बीटीएस अॅडिशन इअरबड्स झळकवले आहेत. स्पेशल अॅडिशन स्मार्टफोनला पर्पल रंगाचा बॅक पॅनल देण्यात आला असन त्याच्या रियरच्या येथे BTS लोगो देण्यात आला आहे. डिवाइसच्या रिटेल बॉक्सवर सुद्धा पुढील आणि मागील बाजूल ही BTS हा लोगो दिसून येणार आहे.(Apple iMac 0.8-inch iPad Air जुलै महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता)

सॅमसंग गॅलेक्सी एस20 प्लस 5जी बीटीएस अॅडिशन आणि सॅमसंग गॅलेक्सी एस20 प्लस बीटीएस एडिशन स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंग येत्या 19 जून पासून Samsung,com वर सुरु होणार आहे. या तिन्ही डिवायसची विक्री 9 जुलैपासून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी बड्स प्लस बीटीएस अॅडिशनसाठोी प्री-ऑर्डर अमेरिका आणि दक्षिण कोरियात Weverse Shop च्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. Weverse Shop येथे SamsungGalaxy+BTS Edition ची किंमत $199 म्हणजेच जवळजवळ 15,200 रुपये आहे. रिटेल बॉक्समध्ये सॅमसंगने डिवाइसेस पर्सनलाइज करण्यासाठी डेकोरेटिव्ह स्टिकर्स सुद्धा दिले आहेत.

>>Samsung Galaxy S20+ BTS Edition स्पेसिफिकेशन:

सॅमसंग गॅलेक्सी एस20 प्लस मध्ये 6.7 इंचाचा इनफिनिटी ओ डायनमिक एमोलेड 2X डिस्प्ले दिला आहे. यामध्ये सॅमसंग एक्सीनॉस 990 प्रोसेसर आणि 8GB रॅम दिला आहे. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला असून सेल्फीसाठी 10 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. गॅलेक्सी एकस 20+ मध्ये 4000mAh ची बॅटरी असून तो अॅन्ड्रॉइड 10 वर काम करणार आहे.

>>Samsung Galaxy Buds+ फिचर्स:

सॅमसंग गॅलेक्सी बड्स प्लमध्ये तीन माईक देण्यात आले आहे. नॉइज आयसोलेशन उत्तम आणि एम्बियंट साउंड टेक्नॉलॉजी सपोर्ट करणार आहे. यामध्ये टू-वे स्पीकर सिस्टम असणार आहे. गॅलेक्सी बड्स प्लस AKG- ट्यूनड्य असून यामध्ये 11 तासांची बॅटरी लाइफ मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.(Flipkart Laptop Bonanza Sale: फ्लिपकार्ट बोनान्झा सेल मध्ये HP, Dell, Asus च्या या लॅपटॉप्सवर मिळतेय भन्नाट सूट)

सॅमसंग इयरबड्समध्ये 85mAh ची बॅटरी आणि चार्जिंग केसह 11 तासांची उत्तम बॅटरी लाइफ मिळणार आहे. सॅमसंगने असे म्हटले आहे की, फक्त 3 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये ते पुढील 3 तास काम करु शकतात. गॅलेक्सी बड्स प्लस Qi वायरलेस चार्जिंग स्टँटर्ड, ब्लूटूश v5 आणि IPX2 ऑफर करत आहे.

त्याचसोबत सॅमसंग गॅलेक्सी एस20 प्लस मध्ये Samsung Exynos 9 Octa वर काम करणार आहे. तसेच यामध्ये 128GB स्टोरेज देण्यात आला असून 4500mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच 12MP+64MP+12MP कॅमेरा दिली आहे. तर 8जीबी रॅम आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.