Murder

Odisa: ओडीसा येथे 22 वर्षीय तरुणाने आई-वडील आणि बहिणीला दगड आणि लाकडी काठ्यांनी मारहाण करून ठार मारल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. जगतसिंगपूर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयबाडा गावात घडली असून मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादानंतर आरोपीने वडील प्रशांत सेठी, आई कनकलता आणि बहीण रोसलिन यांच्यावर हल्ला केला. ऑनलाइन गेमच्या कथित व्यसनावरून सूर्यकांत चे त्याच्या पालकांशी अनेकदा वाद होत असत. दरम्यान, मारहाणीत खून झाल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी शेजाऱ्यांना माहिती दिली. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाईकांनी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, आरोपी बराच काळ गेम खेळत होता, ज्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला असावा.

माहिती मिळताच जगतसिंगपूरचे एसपी भवानी शंकर उदगाता यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असून आम्हाला याबाबत माहिती मिळाली आहे. सर्व बाबींची तपासणी करून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सूरजकांतचा मोठा भाऊ रमाकांत सेठी याने सांगितले की,  "तो अनपेक्षितपणे वागायचा आणि कोणालाही न सांगता दररोज तासनतास गायब व्हायचा, दरम्यान, पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.