
Sushil Kumar Bail: ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखड यांच्या हत्येच्या (Sagar Dhankhar Murder) आरोपाखाली तुरुंगात असलेला ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू (Wrestling) सुशील कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात, सुशीलला 2 जून 2021 रोजी अटक करण्यात आली होती. सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) हे भारतीय कुस्तीतील एक मोठे नाव आहे. पण 2021 मध्ये घडलेल्या हत्येच्या घटनेने त्याचे कुस्तीतील करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
खून आणि गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप
कुस्तीपटू सागर धनकरच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलिंपियन सुशील कुमार अनेक वर्षे तुरुंगात होता. सुशील कुमारवर 4 मे 2021 रोजी मालमत्तेच्या वादातून दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सागर धनखड आणि त्याचे मित्र जय भगवान आणि भगत यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सागर धनखडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर सुशील कुमारला अटक करण्यात आली.
#WATCH | Delhi: On wrestler Sushil Kumar granted bail, his counsel Advocate R S Malik says, "There has been a long delay. He has been in jail for the last 3.5 years. All witnesses have been examined. No evidence has been presented against him so far. The court considered this as… pic.twitter.com/d7m1wKbnVw
— ANI (@ANI) March 4, 2025
2023 मध्ये जामीनही मिळाला होता
2023 मध्ये, सुशील कुमार यांना वैद्यकीय कारणास्तव एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. सुशील कुमारला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सुशील कुमार यांना कोर्टाकडून 23 जुलै ते 30 जुलै पर्यंत अंतरिम जामीन मिळाला.
ऑलिंपिकमध्ये भारतासाठी इतिहास रचला
सुशील कुमारने कुस्तीमध्ये भारतासाठी ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकले आहेत. 2008 च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले. सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान सुशील कुमारला मिळाला. यानंतर तो देशातील तरुण कुस्तीगीरांसाठी आदर्श बनला होता.