Abu Azmi’s Remark On Aurangzeb | X @abuasimazmi

महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच तापायला सुरूवात झाली आहे. सपा आमदार अबु आझमी (Abu Azmi) यांनी काल(3 मार्च) विधिमंडळ परिसरात मीडीयाशी बोलताना औरंगजेब आणि त्याच्या शासन व्यवस्थेचं कौतुक केल्याने ते चर्चेत आले आहेत. महायुती कडून त्यांच्यावर हल्लाबोल होत असताना अखेर त्यांनी औरंगजेब बद्दल केलेलं वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ जारी करत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. Abu Azmi Aurangzeb Remark: 'औरंगजेब क्रूर नव्हता', अबू आझमी यांचे वक्तव्य; सर्वपक्षीयांकडून संताप, माफीची मागणी, गुन्हा दाखल .

अबु आझमींच्या कोणत्या वक्तव्यावरून रंगला वाद?

मीडीयाशी बोलताना अबु आझमी म्हणाले होते, 'औरंगजेबच्या शासनामध्ये भारत 'सोने की चीडीया; होता. जगाच्या जीडीपीत भारताचं योगदान 24% होते. यावरून राज्यात गदारोळ सुरू झाला. अबु आझमींच्या वक्तव्यावरून महायुतीच्या आमदारांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेने राज्यवापी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र आता अबु आझमी यांनी आपल्या वक्तव्याला मागे घेतले आहे.

अबु आझमी यांची एक्स पोस्ट

अबु आझमी यांनी स्पष्टीकरण देताना माझं वक्तव्य कोणत्याही चूकीच्या विचाराने नव्हते. मी एका मीडिया प्रतिनिधीच्या प्रश्नावर भाष्य केले होते. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि गोंधळ निर्माण झाला.

आसामच्या एका नेत्याने राहुल गांधींना औरंगजेबासारखे मांडले आहे. यावर मी अवध ओझा, राम पुनियानी, राजीव दीक्षित यांसारख्या लोकांच्या बोलण्यावर आधारित औरंगजेबबद्दल बोललो. पण मी कोणाचाही अपमान केला नाही.तरीही मी चुकीचे बोललो असे कोणाला वाटले तर मी जे बोललो ते परत घेतो. विधानसभा चालवावी. अशा विषयांवर विधानसभा थांबवणे हा महाराष्ट्रातील जनतेच्या हितावर अन्याय होईल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले होते. अनेक नेत्यांनी सांगितले की, आझमी यांनी छत्रपती शिवाजींवर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले.शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनीही अबु आझमीं विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.