Navneet Rana |

Navneet Rana on Abu Azmi: औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी नुकतेच केले. त्यावरून राज्यातील वातावरण चांगलच ढवळून निघाल आहे. राजकीय वर्गातून अबू आझमी यांच्यावर जहीऱ्या भाषेत टिका होत आहे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असेही अबू आझमी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी थेट औरंगजेबाचा अबू आझमींचा बाप असा उल्लेख केला. त्याशिवाय, औरंगजेबाची कबर अबू आझमींनी त्यांच्या घरात लावावी असे म्हटले आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा ?

'ज्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला, अशा औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना औरंगजेबवर प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्यांचा बाप औरंगजेबाची कबर लावून घ्यावी.' अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलीय आहे. त्या पुढे म्हणाल्या, 'अबू आझमी यांनी सांगितले की, औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. तर त्यांना मी लक्षात आणून देते की त्यांनी एकदा छावा चित्रपट पाहावा. किंबहुना सरकारला मी आवाहन करते की, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर नाव दिलं आहे. जे औरंगजेबला या राज्यात राहून आपला बाप म्हणून राहतात. अश्या लोकांना उत्तर देण्याच काम राज्य सरकारने केलं पाहिजे. हिंदुत्व विचारधारेचे सरकार आमचे आहे, असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना क्षमा नाही', असेही त्या म्हणाल्या.

अबू आझमींवर गुन्हा दाखल

अबू आझमी यांच्यावर औरंगजेबाविषयीच्या वक्तव्यावरुन मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी या विषयी तक्रार दाखल करत मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.