Sunil Gavaskar and Rohit Sharma (Photo Credit - X)

Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसवर चुकीचे भाष्य केल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा ‘जाडा’ आहे. त्याने वजन कमी करण्याची गरज आहे अशी टिप्पणी शमा मोहम्मद यांनी केल्यानंतर त्यांच्यावर देशभरातील क्रिकेट चाहते तुटून पडले आहेत. शमा यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले. रोहितच्या कर्णधारपदाला अप्रभावी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावर आता दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Shama Mohamed on Rohit Sharma: 'रोहित शर्मा खूप जाडा'; काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांचे संतापजनक विधान; सोशल मीडियावर टीका होताच दिले स्पष्टीकरण (Video))

सुनील गावसकर म्हणाले की, “क्रिकेट हा मानसिक बळावर आधारित खेळ आहे. खेळाडूच्या शारीरिक स्वरूपाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जर निवडीचा पहिला निकष फिटनेस असेल तर मॉडेल्सना संघात निवडलं पाहिजं’, असे ते म्हणाले. त्याशिवाय, त्यांनी त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना पुढे म्हटले की, 'मी नेहमीच म्हटलं आहे की, जर तुम्हाला फक्त सडपातळ मुलं हवी असतील, तर तुम्ही मॉडेलिंग स्पर्धांमध्ये गेलं पाहिजे आणि तेथून मॉडेल्सची निवड करायला हवी.'

'आम्ही सरफराज खानबद्दल बोलत होतो. त्याचं वजन जास्त असल्याने बराच काळ त्याला बदनाम केलं गेलं. पण जर त्याने कसोटी सामन्यात भारतासाठी 150 धावा केल्या आणि त्यानंतर आणखी दोन किंवा तीन वेळा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या. मला वाटत नाही की आकाराचा त्याच्याशी काही संबंध आहे. तुमची मानसिक ताकद महत्त्वाची आहे. तुम्ही अंतर टिकवू शकता की नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चांगली फलंदाजी करा, जास्त वेळ फलंदाजी करा आणि धावा करा,' असं ते पुढे म्हणाले.

शमा मोहम्मदच वक्तव्य

शमा मोहम्मदने ‘X’ वर लिहिले होते की, ‘रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे. त्याला वजन कमी करायचे आहे. तसेच, तो भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात निराशाजनक कर्णधार आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री यांसारख्या माजी खेळाडूंच्या तुलनेत त्याच्यात असे काय खास आहे. तो एक सरासरी कर्णधार आहे आणि त्याचबरोबर एक सरासरी खेळाडू आहे ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा मान मिळाला आहे’.