PC-X

Shama Mohamed on Rohit Sharma: काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma)वरील त्यांच्या विधानानंतर क्रिकेट चाहत्यांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वजण त्यांच्यावर टीका करत आहेत. शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी आता या संपूर्ण प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. विराट कोहलीला पाहता रोहित शर्माचे वजन खेळाडू म्हणून जास्त आहे यावर त्यांनी भर दिला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान, शमा मोहम्मद यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, 'रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे. त्याला वजन कमी करावे लागेल आणि निःसंशयपणे तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात प्रभावशाली कर्णधार आहे.', असे त्यांनी लिहिले होते.

शमा यांच्या या कमेंटवर जेव्हा एका पाकिस्तानी पत्रकाराने रोहित शर्माला जागतिक दर्जाचा खेळाडू म्हटले तेव्हा शमाने उत्तर दिले की, 'गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री यांसारख्या माजी कर्णधारांच्या तुलनेत रोहितमध्ये इतके जागतिक दर्जाचे काय आहे?' तो एक सरासरी कर्णधार असण्यासोबतच, एक सरासरी खेळाडू देखील आहे ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा मान मिळाला. मात्र, जेव्हा या कमेंट्सवरून वाद वाढला तेव्हा त्यांनी पोस्ट डिलीट केल्या.

शमा यांची पोस्ट सोशल मीडियावर येताच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. काहींनी रोहित शर्माची आकडेवारी सांगितली तर काहींनी कर्णधार म्हणून त्याचा विजयी रेकॉर्ड दाखवला. या सगळ्यात, भाजपने देखील उडी घेतली. 'काँग्रेस आता राहुल गांधींना क्रिकेटच्या मैदानात आणू इच्छिते का?' असा खोचक प्रश्न भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी उपस्थित केला.

इंडिया अलायन्स पार्टी शिवसेना (यूबीटी) च्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही शमा मोहम्मद यांच्या वक्तव्याचा विरोध केला. त्यांनी X वर लिहिले, 'मी क्रिकेटची फार मोठी चाहती नाही पण खेळात मर्यादित रस असूनही मी असे म्हणू शकते की रोहित शर्माचे वजन किंचीत जास्त आहे. तरीही, त्याने भारतीय संघाला नवीन उंचीवर नेले आहे. त्यांची वचनबद्धता महत्त्वाची आहे.

शमा मोहम्मद यांचे स्पष्टीकरण

शमा मोहम्मद यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, 'खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत हे एक सामान्य ट्विट होते. हा बॉडी शेमिंगचा विषय नव्हता. मला वाटलं त्याचं वजन जास्त आहे, म्हणूनच मी ट्विट केलं. मला कोणत्याही कारणाशिवाय लक्ष्य केले जात आहे. लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. मी फक्त माझा मुद्दा मांडला. जेव्हा मी त्याची तुलना माजी कर्णधारांशी केली तेव्हा हे देखील लोकांनी चुकीचे घेतले आहे. मला म्हणायचे होते की म्हणजे विराट कोहलीकडे पाहा. तो त्याच्या सहकारी खेळाडूंना कसे प्रोत्साहन देतो.