Blast Caught on Camera in Hyderabad: कुकटपल्लीच्या बाग अमीर भागात सोमवारी गॅस भरण्याच्या दुकानात स्फोट झाल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे हे दुकान बेकायदेशीररित्या सुरू होते. झालेल्या स्फोटामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या स्फोटात दुकान मालक शंकर गंभीर जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आणि लोक घटनास्थळी धावले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी तातडीने पोहोचले. सध्या स्फोटाचे कारण शोधण्याचे काम सुरु आहे.

बेकायदेशीर गॅस-सिलिंडर विक्री दुकानात स्फोट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)