PAK Team (Photo Credit - Twitter)

Pakistan vs New Zealand: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या नंतर, पाकिस्तान क्रिकेट संघ न्यूझीलंडचा दौरा करेल, जिथे एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळल्या जातील. या दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. टी-20 मालिकेसाठी सलमान अली आगा याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर मोहम्मद रिझवानला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय बाबर आझम आणि नसीम शाह यांनाही टी-20 संघात संधी मिळालेली नाही. (हे देखील वाचा: IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका कधी सुरु होणार होईल? सुनील गावस्करांनी दिलं अचूक उत्तर)

आगा  घेतली टी-20 मालिकेची जबाबदारी

टी-20 मालिकेसाठी सलमान अली आगा यांना पाकिस्तानचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. मोहम्मद रिझवान, बाबर आझम आणि नसीम शाह यांना टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. तर शाहीन आफ्रिदीची संघात निवड झाली आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी मोहम्मद रिझवानकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. याशिवाय बाबर आझमलाही एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.

16 मार्चपासून सुरू होणार मालिका

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका 16 मार्चपासून सुरू होणार आहे. शेवटचा टी-20 सामना 26 मार्च रोजी खेळला जाईल. टी-20 मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 29 मार्च रोजी खेळला जाईल.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा एकदिवसीय संघ

मोहम्मद रिजवान (कर्णधार), सलमान अली आघा, अब्दुल्ला शफीक, अब्रार अहमद, आकिफ जावेद, बाबर आझम, फहीम अशरफ, इमाम उल हक, खुशदिल शाह, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सुफयान मुकीम, तैयब ताहिर.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तान टी-20 संघ

सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान, अब्दुल समद, अब्रार अहमद, हरिस रौफ, हसन नवाज, झंदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हरिस, मोहम्मद इरफान खान, ओमैर बिन युसूफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम, उस्मान खान.