सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध नेटवर्किंग साईट ट्वीटरच्या (Twitter) सीईओ (CEO) जॅक डोरसे (Jack Dorsey) यांनी त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन राजकीय जाहिरांना जागतिक स्तरावर बंदी घातली आहे. याबाबत डोरसे यांनी ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे. राजकीय जाहीराती ट्वीटरवर बंद करण्यामागील कारण सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, अशा जाहिराती इंटरनेटवर अधिराज्य गाजवतात आणि व्यावसायिक जाहिरातदारांसाठी ते अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध होत होते.व्यावसायिक जाहिरातींसाठी, तरीही हे ठीक म्हटले जाऊ शकते, परंतु राजकारणात हे एक मोठे धोका असू शकते.
दुसऱ्या बाजूला फेसबुकने यापूर्वीच आम्ही राजकीय जाहिरातील दाखवणे बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत परकीय हस्तक्षेपाच्या बातम्यांमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील राजकीय जाहिराती जागतिक स्तरावर चिंता बनत आहेत. ही आव्हाने फक्त राजकीय नव्हेच तर प्रत्येक प्रकारच्या इंटरनेट कम्युनिकेशनला प्रभावित करतात. त्याचसोबत कंपनी या निर्णयासह फायनल पॉलिसी 15 नोव्हेंबर पर्यंत जाहीर करणार आहे. त्यानंतर हा निर्णय 22 नोव्हेंबर पासून लागू होणार असून जाहिराती बंद करण्यापूर्वी जाहिरातदारांना एक नोटिस पिरियड सुद्धा दिला जाणार आहे.(धक्कादायक! या वर्षातील सर्वात मोठी सायबर चोरी; 1.3 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचे कार्ड डिटेल्स झाले लीक)
Tweet:
A political message earns reach when people decide to follow an account or retweet. Paying for reach removes that decision, forcing highly optimized and targeted political messages on people. We believe this decision should not be compromised by money.
— jack 🌍🌏🌎 (@jack) October 30, 2019
राजकीय जाहिरातबाजी ही सर्वात जास्त फेसबुक, ट्वीटर आणि गुगल सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर करण्यात येते. मात्र आता राजकीय जाहीरातीसाठी काही नियमांची आवश्यकता असल्याचे डॉर्सी यांनी सांगितले आहे. सध्या राजकीय जाहिरातींच्या मुद्द्यांना सामोरे जाण्यासाठीही भारत संघर्ष करीत आहे. सरकारने या बाबत सोशल मीडिया कंपन्यांसाठी नियम तयार करण्यास सांगितले आहे. तर डोरसे यांच्या ट्विटला भरपूर पाठिंबा मिळाला आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर म्हणून फेसबुकला टॅगही केले आहे.