Google आणि Apple ला टक्कर देण्यासाठी भारत लॉन्च करणार आपले App Store
Play Store (Photo Credits-Twitter)

Google आणि Apple च्या मोनोपोलिपासून सुटका मिळवण्यासाठी आता भारत स्वत:चे अॅप स्टोर लॉन्च करण्याचा प्लॅनिंग करत आहे. यामुळे भारतीय युजर्सला Google वर अवलंबून रहावे लागणार नाही आहे. समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, देशात जवळजवळ 500 मिलियन स्मार्टफोन उपयोगकर्ते असून त्यामधील बहुतांश गुगल अॅन्ड्रॉइड प्लॅटफॉर्मचा वापर करतात. परंतु भारतीय स्टार्ट अप कडून अशा काही कंपन्यांच्या गोष्टींवर टीका केली आहे जे त्यांच्या वृद्धीवर बंदी घालत आहेत.(Microsoft Word सोबतच ऑफिस अ‍ॅप्समधील डॉक्युमेंट्स तुम्ही पासवर्ड सेट करून सुरक्षित कशी ठेवाल?)

न्यूज एजेंसी Reuters च्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, सरकार भारतीय स्टार्टअपची मदत करण्यासाठी पुढे येत आहे. त्यासाठीच स्वत:चे अॅप स्टोर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. खासियत अशी की, गुगल किंवा अॅपल हे अॅप स्टोर 30 टक्के कमिशन सुद्धा घेणार नाही आहे. सध्या सरकार या अॅप स्टोरची तयारी करत असून ते अॅन्ड्रॉइड फोनमध्ये प्री-इंस्टॉल्ड अॅपच्या आधारावर उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या Reuters च्या एका रिपोर्टनुसार, एक वरिष्ठ भारतीय अधिकारी यांनी असे सांगितले होते की, दिल्लीला कोणताही औपचारिक अनुरोध मिळालेला नाही. पण एक मोबाईल प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी तयार आहे. जेथे अॅप डाऊनलोड करता येणार आहेत. परंतु अद्याप सरकार कडून अॅप स्टोर संबंधित अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.(Apple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स)

दरम्यान, गुगल आणि भारतीय स्टार्ट अपच्या मध्ये वाद झाल्याचे दिसून आले आहेत. गुगलने फूड डिलिव्हरी सर्विस प्रोव्हाइडर कंपनी Zomato आणि Swiggy ला नोटिस पाठवली आहे. ज्यामध्ये असा आरोप लावण्यात आला आहे की, दोन्ही कंपन्या प्ले स्टोरच्या मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करत आहे. यापूर्वी गुगलने डिजिटल पेमेंट सर्विस Paytm ला सुद्धा अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोप लावत प्ले स्टोरवरुन हटवले होते.