Shahid Afridi यांचं नेमकं वय किती? वाढदिवशी पाकिस्तानी क्रिकेटरच्या ट्विटने Netizens मध्ये पुन्हा एकदा वयाबाबत चर्चेला उधाण, पहा Tweets
शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Instagram)

पाकिस्तानचा (Pakistan) अष्टपैलू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) सोमवार, 1 मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्या वयाबद्दल पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिदीचे वय क्रिकेट वर्गामधील चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी आफ्रिदीच्या ट्विटमुळे आणखी एक वादविवाद सुरू झाला. आफ्रिदीने सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवशी चाहत्यांच्या संदेशाबद्दल ट्विट केले आणि हितचिंतकांचे आभार मानले. आफ्रिदीने सांगितले की सोमवारी तो 44 वर्षांचा झाला पण त्याची अधिकृत नोंद अन्यथा दाखवते. आफ्रिदी म्हणाला, "वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार - 44 आज, माझे कुटुंब आणि माझे चाहते ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे." आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सुरु असलेल्या हंगामात चांगल्या कामगिरीचे आश्वासन दिले. आफ्रिदी पीएसएल (PSL) 2020 मध्ये मुलतान सुल्तानकडून खेळत आहे. (Shahid Afridi On PCB: इंजमाम-उल-हक, मोहम्मद यूसुफ, यूनुस खान यांना राहुल द्रविडकडून शिकण्याची गरज; मोहम्मद आमिरच्या निवृत्तीनंतर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार (ICC) आफ्रिदीचा जन्म 1 मार्च, 1980 रोजी झाला होता, म्हणजे तो आता 41 वर्षांचा आहे. मात्र पाकिस्तान स्टारच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानी पत्रकार दानियाल रसूल यांनी आफ्रिदीच्या वयाशी संबंधित विसंगती दर्शवत वाढदिवशी क्रिकेट सुपरस्टारला शुभेच्छा दिल्या. "शाहिद आफ्रिदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @ESPNcricinfo आमच्याकडे त्याचे वय 44 आहेत, , त्यांचे आत्मचरित्र 46 म्हणते!" त्याने म्हटले.

किती वर्ष 44 राहणार?

दर चार वर्षांने त्याचे वय एक वर्षाने वाढते!

आपण 1996 मध्ये 16व्या वर्षी पदार्पण केले!

वय सांगितल्याबद्दल धन्यवाद

आज तरी खरे वय सांग!

पीएसएलनुसार 40, आत्मचरित्रानुसार 46, या ट्विटनुसार 44

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच त्याने निवृत्ती घेतली आहे, तर आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीग आणि जगभरातील इतर स्पर्धांमध्ये खेळत आहे. पीएसएलच्या सध्या सुरू असलेल्या मोसमात त्याने मुल्तान सुल्तानसाठी 4 सामन्यात 3 धावा आणि 5 विकेट घेतल्या आहेत. आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी -20 सामने खेळले आणि तीन फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 1716, 8064 आणि 1416 धावा केल्या आहेत. माजी अष्टपैलू खेळाडूने टी-20 वर्ल्ड कप 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानकडून अंतिम सामना खेळला होता. कारकीर्दीत दोन वेळा आधी निवृत्तीची घोषणा केली आणि नंतर पुन्हा यू-टर्न करत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर, 2016 वर्ल्ड टी-20 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरचा रामराम ठोकला.