पाकिस्तानी क्रिकेट संघात सध्या विचित्र गोष्टी घडत आहेत. न्यूझीलंडच्या संघाकडून मालिका गमवल्यानंतर पाकिस्तानच्या 6 खेळाडूंना संघातून बाहेर काढण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि त्यांच्या संबंधित लोकांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोहम्मद आमीरनेही निवृत्ती घेताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावर पाकिस्तानाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यानेही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानचे खेळाडू इंजमाम-उल-हक (Inzamam-ul-Haq), मोहम्मद यूसुफ (Mohammad Yusuf) आणि यूनुस खान (Younis Khan) या तिघांना भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.
"ही चांगली गोष्टी नाही. बोर्डाने आपल्या खेळाडूंसह चांगले संबंध ठेवले पाहिजेत. मोहम्मद आमीर असू किंवा इतर कोणता खेळाडू पीसीबीने त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. ज्या खेळाडूंना तुम्ही संघाबाहेर करता, त्याला त्याचे कारण समजले पाहिजे. चेअरमेन किंवा सलेक्टर यांनी खेळाडूंशी बोलले तर, चांगले होईल", असे शाहिद आफ्रिदी एका कार्यक्रमात म्हणाला आहे. हे देखील वाचा- Rohit Sharma: 'माझे बाद होणे दुर्देवी आहे, पण त्याबद्दल मला खंत नाही' ट्रोलर्सला रोहित शर्मा याचे उत्तर
दरम्यान, शाहिद आफ्रिदीने राहुल द्रविड याचे कौतूक करताना म्हणाला की, 'माजी क्रिकेटपटूंनी फक्त पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक कसा बनता येईल? याकडे लक्ष देऊ नये, असे मला वाटते. मोहम्मद यूसुफ, युनूस खान आणि इझमाम-उल-हक यांसारखे अनेक माजी खेळाडू कनिष्ठ स्तरावर चांगले काम करू शकतात, जसे राहुल द्रविड भारतासाठी करत आहे, असेही शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे. सध्या राहुल द्रविड हे एनसीएचे प्रमुख आहेत. तसेच अंडर-19 संघाचे प्रशिक्षकदेखील आहे.