भारत विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात (Australia Vs India 4th Test) ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात 369 धावा केल्या आहेत. त्यानंतर भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. भारताचा सलामीवीर शुबमन गिल अवघ्या धावा करुन बाद झाल्यानंतर अनुभवी रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठी खेळी करणार अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्माने बेजबाबदार फटका मारला. ज्यामुळे रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. यावर रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझे बाद होणे दुर्देवी आहे, पण त्याबद्दल मला खंत नाही, अशा शब्दात रोहित शर्माने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय खेळांडूसाठी चांगला गेला नाही. या दौऱ्यात भारताच्या अनेक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला आहे. अश्विन, जडेजा, बुमराह आणि विहारी हे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. त्यामुळे रोहितकडून संघाला भरपूर अपेक्षा आहेत. पण आज रोहित शर्मा नॅथन लायनच्या चेंडूवर ज्या पद्धतीने बाद झाला. त्यावरुन त्याच्यावर भरपूर टीका होत आहे. रोहितवर चहूबाजूंनी टीका होत असताना या विषयावर तो म्हणाला की, “नॅथन लायनच्या गोलंदाजीवर मी जो फटका खेळलो, त्याबद्दल मला अजिबात खंत नाही. त्यावेळी बॅट आणि बॉलचे कनेक्शन झाले नाही म्हणून मला चेंडू जिथे पोहोचवायचा होता, तिथे पोहोचवू शकलो नाही. मैदानावर गेल्यानंतर गोलंदाजांवर दबाव टाकायला मला आवडते. गोलंदाजांवर दबाव टाकणे, ही माझी या संघातील भूमिका आहे. हे देखील वाचा- कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी सचिन तेंडुलकर याने ट्विट्द्वारे दिल्या शुभेच्छा!
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पाऊस पडल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी भारतीय संघ दोन बाद 62 धावांवर खेळत आहे. या निर्णायक सामन्यात कोणता संघ बाजी मारेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.