Sachin Tendulkar (Photo Credits: PTI)

बहुप्रतिक्षित अशी कोरोना व्हायरस (Coronavirus) वरील लस (Vaccine) दाखल झाली असून आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. दरम्यान, सामाजिक भान असणारा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सरकारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन सचिनने केले आहे आणि एकत्रितपणे आपण ही लढाई जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे. (IPL 2021 Auction: अर्जुन तेंडुलकरसाठी आयपीएल लिलावात या 3 फ्रँचायझींमध्ये रंगू शकते चुरस, मुंबईकर गोलंदाजाला मिळू शकतो चांगला भाव)

सचिनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "कोविड-19 विरुद्ध लढत असलेली लढाई इंडियाच्या शेवटच्या कसोटी सामन्यासारखी आहे. यात खूप चढउतार दिसून आले. परंतु, आपल्या फ्रंटलाईन वॉरियर्सनी खूप धैर्याने संकटाचा सामना करत आपल्या देशाला पडण्यापासून वाचवले."

पुढे त्याने लिहिले की, "आम्ही सर्व फ्रंटलाईन वॉरियर्सचे आभारी आहोत आणि लसीकरणाचा हा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. ही लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे आपण नियमित काळजी घेणे गरजेचे आहे."

"लसीकरणामध्ये सुद्धा मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पाळणे आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये आपण एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. आपण सर्वांनी एकत्रितरीत्या टीम सारखे लढू आणि कोविड-19 वर विजय मिळवू," असेही त्याने पुढे म्हटल ेआहे.

सचिन तेंडुलकर ट्विट:

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईतील पहिली लस देण्यात आली. त्यानंतर इतर डॉक्टर्स आणि आरोग्यसेवक यांना लस देण्यात येईल. लस मिळाली तरी नियमांचे पालन करण्याचा संदेश मुख्यमंत्र्यासह पंतप्रधानांनी देखील आहे.