अर्जुन तेंडुलकर (Photo Credits: Instagram/Arjun Tendulkar)

Will Arjun Tendulkar Debut in IPL 14: दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) शुक्रवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) एलिट ई गटातील हरियाणाविरुद्ध सामन्यात मुंबईच्या (Mumbai) वरिष्ठ संघात प्रवेश केला. बीकेसी मैदानावर खेळल्या गेलेल्या हरियाणाविरुद्ध मुंबईच्या प्लेइंग एलेवे मध्ये अर्जुनचा समावेश झाला होता. 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करत 21 वर्षीय 0 धावांवर नाबाद राहिला आणि त्याने गोलंदाजी केलेल्या तीन ओव्हरमध्ये 34 धावा दिल्या. तथापि, आनंदाची बाब म्हणजे त्याने हरियाणाचा सलामीवीर चैत्य बिश्नोईला केवळ 4 धावांवर बाद केले. आता मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून किमान एक सामना खेळल्यामुळे अर्जुनने पुढील महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) लिलावासाठी पात्र ठरला आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे की अर्जुनने टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सच्या नेट सेशन्समध्ये नियमितपणे गोलंदाजी केली आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: मुंबईचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात, हरियाणाच्या 8 विकेटच्या विजयाने ओढवली सलग तिसऱ्या पराभवाची नामुष्की)

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या आवृत्तीपूर्वी मिनी लिलाव होणार असून अर्जुन तेंडुलकर आठपैकी एका फ्रँचायझीमध्ये सामील होण्याच्या अपेक्षेत असेल. पण यंदाच्या लिलावात काही फ्रँचायझी अर्जुनसाठी बोली लागावी शकतात आणि त्याला यांच्याकडून चांगला भाव मिळू शकतो. चेन्नई सुपर किंग्जला वेगवान गोलंदाजात रस असेल. संघातील वरिष्ठ खेळाडू त्यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धारत पोहोचले आहेत आणि त्यांना आपला संघ सुधारण्याची आवश्यकता आहे या वस्तुस्थितीचा विचार करता चेन्नई अर्जुनसाठी बोली लगावू शकतात. राजस्थान रॉयल्सही अर्जुनसाठी बिड करू शकतात. रॉयल्स संघात यापूर्वीच जोफ्रा आर्चर जयदेव उनाडकट यांच्या सारखे वेगवान गोलंदाज आहेत आणि अर्जुन या वेगवान गोलंदाजांना चांगली साथ देऊ शकतो.

दरम्यान, काही वृत्तानुसार आयपीएलच्या 2021 आवृत्तीचा लिलाव 11 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाऊ शकतो. अर्जुन गोलंदाजी करण्याबरोबर उपयुक्त फलंदाजही आहे. अर्जुनने यापूर्वी टीम इंडियासोबत नेट गोलंदाज म्हणून दौरा केला आहे. 2017 इंग्लंडच्या वरिष्ठ संघासोबत त्याने सराव केला होता. त्यावेळी, त्याने आपल्या यॉर्कर टाकण्याच्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अर्जुन अंडर-19 आणि अन्य वयोगटातील स्पर्धेत मुंबईकडून खेळला आहे.