Kuldeep Yadav (Photo Credit- X)

Asia Cup 2025 Point Table: आशिया कप २०२५ ची सुरुवात ९ सप्टेंबर रोजी झाली असून, आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले गेले आहेत. यजमान भारतीय संघाने ग्रुप-ए मध्ये यूएईविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून आपल्या अभियानाची सुरुवात केली, तर ग्रुप-बी मध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या संघानेही आपले पहिले सामने जिंकले आहेत. आता सर्वांचे लक्ष पॉइंट्स टेबलवर लागले आहे, कारण दोन्ही गटांतून टॉप-२ मध्ये राहणाऱ्या संघांना सुपर-४ मध्ये प्रवेश मिळणार आहे. PAK vs Omam: दुबईमध्ये पाकिस्तानचा रेकॉर्ड खराब; ओमानविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी वाढली चिंता

ग्रुप-ए मध्ये टीम इंडिया टॉपवर, नेट रनरेटही सर्वोत्तम

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप २०२५ मधील आपला पहिला सामना एकतर्फी ९ विकेट्सने जिंकला. भारतीय गोलंदाजांनी आधी यूएईच्या संघाला फक्त ५७ धावांवर रोखले आणि नंतर हे लक्ष्य ४.३ षटकांत सहज पूर्ण केले. या मोठ्या विजयामुळे भारतीय संघाला २ गुण मिळाले असून, त्यांचा नेट रनरेट १०.४८३ इतका दमदार आहे. सध्या टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या ग्रुपमध्ये यूएईचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान आणि ओमानने अजून एकही सामना खेळलेला नाही.

ग्रुप-बी च्या गुणतालिकेत अफगाणिस्तान पहिल्या स्थानावर

अफगाणिस्तानच्या संघाने आशिया कप २०२५ मध्ये आपला पहिला सामना हाँगकाँगला ९४ धावांनी हरवून शानदार सुरुवात केली. त्यामुळे ते २ गुणांसह ग्रुप-बी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तानचा नेट रनरेट ४.७ आहे, जो स्पर्धेत पुढे खूप महत्त्वाचा ठरेल. दुसरीकडे, बांगलादेशनेही आपला पहिला सामना हाँगकाँगला ७ विकेट्सने हरवून २ गुण मिळवले आहेत, पण त्यांचा नेट रनरेट १.००१ आहे. तर, सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर हाँगकाँगचा संघ ग्रुप-बी मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे, तर श्रीलंकेने अजून एकही सामना खेळलेला नाही.