
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आज दुबईमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात किवींनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने एकदिवसीय सामन्यात सलग 15 वेळा नाणेफेक गमावली आहे तर रोहित शर्मा सलग 12 वेळा नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार बनला आहे. यासोबतच त्यांच्या नावावर एक अवांछित रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक टॉस गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत हिटमॅनचे नाव नोंदवले गेले आहे. त्याने सलग 12 सामन्यात नाणेफेक गमावून वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराची बरोबरी केली आहे. या महान फलंदाजाच्या नावावर या फॉरमॅटमध्ये सलग 12 सामन्यांमध्ये टॉस हरण्याचा विक्रमही आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक नाणेफेक गमावणारे कर्णधार
12 रोहित शर्मा (नोव्हेंबर 2023 - मार्च 2025*
12 ब्रायन लारा (ऑक्टोबर 1998 - मे 1999)
11 पीटर बोरेन (मार्च 2011 - ऑगस्ट 2013)
भारताने सलग 15 वेळा नाणेफेक गमावली
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर संघाने नाणेफेक जिंकलेली नाही. या काळात, भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका, श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका, इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसह पाचही सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे
न्यूझीलंड: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क, नाथन स्मिथ.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.