Photo Credit- X

ICC 'Player of the Month' September 2025: सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या असाधारण कामगिरीसाठी आयसीसीकडून खेळाडूंना 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. पुरुषांच्या शर्यतीत दोन भारतीय आहेत, तर महिलांच्या शर्यतीत एका पाकिस्तानी खेळाडूमुळे भारतीय सुपरस्टारला कठीण स्पर्धा निर्माण झाली आहे. पुरुषांसाठीच्या 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे शर्यतीत आहेत. त्यांच्यासोबत झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट देखील आहे.

  • अभिषेक शर्मा: एसीसी आशिया कप २०२५ दरम्यान त्याने ४४.८५ च्या सरासरीने ३१४ धावा केल्या आणि या काळात तीन स्फोटक अर्धशतके ठोकली. तो सध्या नंबर वन टी-२० फलंदाज आहे.
  • कुलदीप यादव: टीम इंडियाचा हा फिरकीपटू २०२५ च्या आशिया कप दरम्यान सात सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ६.२७ होता.
  • ब्रायन बेनेट: या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेनेटने ५५.२२ च्या सरासरीने ४९७ धावा केल्या असून, टी-२० मध्येही त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे.

Prithvi Shaw Fight: १८१ धावांच्या खेळीनंतर पृथ्वी शॉचा संयम सुटला; मुशीर खानसोबत नेमका कशावरून झाला 'तो' वाद? पाहा व्हिडिओ

महिलांमध्ये स्मृती मानधनाविरुद्ध सिद्रा अमीनची चुरस

महिला खेळाडूंच्या शर्यतीत भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना ही जोरदार दावेदार आहे. मात्र, तिला पाकिस्तानच्या सिद्रा अमीनकडून कडवी स्पर्धा मिळत आहे.

  • स्मृती मानधना : तिने ७७ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या असून, तिचा स्ट्राईक रेट १३५.६८ आहे. मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतकही ठोकले आहे.
  • सिद्रा अमीन : या पाकिस्तानी खेळाडूने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना २९३ च्या अविश्वसनीय सरासरीने धावा केल्या. तिने तीन डावांमध्ये दोन शतके झळकावली.
  • ताजमिन ब्रिट्स : यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेची ताजमिन ब्रिट्स आहे, जिने पाकिस्तानविरुद्ध दोन स्फोटक शतके झळकावली. आता या तिन्ही गटांमधील विजेत्यांचा निर्णय मतदानाद्वारे घेतला जाईल.