Photo Credit- X

Prithvi Shaw Fight: महाराष्ट्राकडून मुंबईविरुद्ध सराव सामना (Warm-up Match) खेळायला उतरलेल्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आपल्या फलंदाजीने जबरदस्त प्रभावित केले. २१९ चेंडूंमध्ये त्याने एकापेक्षा एक दमदार शॉट्स लावले आणि १८१ धावांची लाजवाब खेळी करत फॉर्ममध्ये यशस्वी पुनरागमन केले. मात्र, शतक ठोकून तो बाद झाल्यानंतर मैदानात एक अतिशय लाजिरवाणा प्रकार घडला. बाद झाल्यानंतर शॉला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो मैदानातच मुंबईच्या मुशीर खानसोबत (Musheer Khan) भिडला. हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या शॉने मुशीरला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. शॉची ही लज्जास्पद कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.<

१८१ धावांच्या खेळीनंतर पृथ्वी शॉने गमावला आपा

पृथ्वी शॉने मुंबईविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सराव सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने सलामीला येत अर्शिन कुलकर्णीसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी ३०५ धावांची विक्रमी भागीदारी रचली. शॉच्या पुढे प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. त्याने १८१ धावांची शानदार खेळी केली. Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचे श्रेय गौतम गंभीरला नाही, तर राहुल द्रविडला; रोहित शर्माचे मोठे विधान!

शॉ पूर्णपणे संतापला

मात्र, बाद झाल्यानंतर शॉ पूर्णपणे संतापला. शॉने एक मोठा शॉट खेळला, पण चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. यानंतर, शॉ आणि मुंबई संघाच्या खेळाडूंमध्ये तीव्र शाब्दिक चकमक  झाली. शॉ इतका संतापला की, तो बॅट घेऊन मुशीर खानला मारण्यासाठी धावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा वाद नेमका कोणत्या गोष्टीवरून झाला, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कळत नाहीये.

महाराष्ट्राकडून फॉर्ममध्ये दमदार वापसी

२०२५-२६ च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाच्या (Domestic Season) सुरुवातीपूर्वी पृथ्वी शॉने बॅटने दमदार प्रदर्शन केले आहे. महाराष्ट्राकडून डावाची सुरुवात करताना त्याने १४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शॉ यावर्षी महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसेल. मागील हंगामात, सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे मुंबई संघाने शॉला संघातून वगळले होते. यानंतर शॉने मुंबई संघ सोडून दुसऱ्या राज्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. १८१ धावांची खेळी करत शॉने आता आपल्या फॉर्ममध्ये दमदार वापसी केल्याचे सिद्ध केले आहे.