Mother's Day 2021 Special: मातृदिनानिमित्त जाणून घ्या 'हे' 5 क्रिकेटपटू आणि त्यांच्या आईंविषयी
सचिन, आई रजनी व वडील रमेश तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

Mother's Day 2021 Special: आईला प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्वपूर्ण भाग असतो. जन्म देण्यापासून आपल्या मुलाला घडवण्याचे कार्य आईच करते. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी भारतासह अन्य देशात मातृदिन साजरा केला जातो. यंदा 9 मे रोजी हा दिवस साजरा केला जाईल. मातृदिन हा मातृत्व आणि समाजात आईची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणारा उत्सव आहे. जगातील बर्‍याच भागात हा दिन विविध दिवशी परंतु बहुतेक मार्च किंवा मे महिन्यात साजरा केला जातो. जगभरात कदाचितच कोणती व्यक्ती असेल जिच्या यशामागे आईची भूमिका नसेल. आपले क्रिकेटपटू देखील याला अपवाद नाही आहे. आज 9 मे, मातृदिनानिमीत्त आपला अशाच दिग्गज क्रिकेपटूंच्या आईंबद्दल जाणून घेऊया ज्यांनी त्यांच्या मुलांच्या यशात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

सचिन व आई रजनी तेंडुलकर (Sachin and Rajni Tendulkar)

‘क्रिकेटचा देव’ सचिनच्या आई रजनी तेंडुलकर विमा क्षेत्रात काम करायच्या. तरीही, त्यांनी प्रत्येक वेळी सामना खेळत असताना सचिनला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. स्वत:च कामं हाताळण्यापासून ते घर संभाळण्यापर्यंत त्या नेहमी एक प्रेरणादायक ठरल्या आहेत. आपल्या कामात कितीही व्यस्त असल्या तरी, आपल्या मुलाला क्रीडा जगातील आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी आवश्यक असलेली सर्व गरज, काळजी आणि समर्थन मिळावा हे त्यांनी सुनिश्चित केले.

एमएस धोनी व आई देवकी देवी (MS Dhoni-Devki Devi)

महेंद्र सिंह धोनीचा क्रिकेटकडे जाणारा मार्ग अडथळ्यांनी भरलेला होता आणि जो त्याला मागे खेचत होता. त्याचा प्रवास सोपा नव्हता, परंतु एक प्रबळ गोष्ट त्याच्या सोबत होती ही म्हणजे त्याची आई देवकी देवी यांचा बिनशर्त पाठिंबा. त्याची आई गृहिणी आहे, परंतु धोनीच्या वडिलांना इतकी खात्री नसतानाही त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेट खेळू देण्याचा प्रयत्न केला. ती त्याची शक्ती आणि त्याची पहिली समर्थक बनली ज्यामुळे आज धोनी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी तो एक बनला आहे.

विराट आणि आई सरोज कोहली (Virat and Saroj Kohli)

विराट कोहली (Virat Kohli) aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaहा पूर्णपणे आपल्या आईबद्दल एकनिष्ठ आहे आणि त्याच्याकडे तशी कारणेही आहेत. सरोज कोहली एक बलाढ्य आणि धर्मशील आई आहे. 2006 मध्ये विराटच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने घराची सूत्रे हाती घेतली आणि तीन मुलांचा संसार सांभाळला. कोहलीच्या सामन्यांना उपस्थित राहण्यापासून घराची काळजी घेण्यापर्यंत त्यांनी शक्य असलेलं सर्वकाही केलं. तिची उपस्थिती आणि सामर्थ्य यामुळेच वडिलांच्या मृत्यूनंतर कोहलीला सशक्त राहण्याची प्रेरणा मिळाली.

रवींद्र जडेजा आणि आई लता जडेजा (Ravindra Jadeja and Lata Jadeja)

जाडेजाचा जन्म जामनगरमधील एका अत्यंत नम्र घरात झाला होता. त्याने भारतीय सैन्य अधिकारी व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती परंतु त्याला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची होती. त्याला आपल्या वडिलांचा अत्यंत भीती वाटत होती, म्हणूनच त्याची आईच त्याला पाठिंबा देत होती आणि त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याच्या पाठीशी उभी राहिली. आपल्या यशाचे श्रेय जडेजा त्याच्या आईला देतो आणि जर ती नसती तर आपण या टप्प्यावर कधीच पोचलो नसतो असा त्याचा विश्वास आहे. 2005 मध्ये आईच्या निधनानंतर जडेजा एकदम खचून गेला होता आणि त्याने जवळपास क्रिकेटही सोडलं होतं. पण, त्याच्या आईने घेतलेले प्रयत्न व्यर्थ जातीलया हे समजताच तोच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतला.

मिताली आणि आई लीला राज (Mithali Raj and Leela Raja)

मितालीच्या यशामागे तिची आई लीला राज यांचा मोठा हात आहे. आपल्या मुलीला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्यांनी आपली मॅनेजरची नोकरी सोडली होती जेणेकरून त्यांना आपल्या घराबरोबर आपल्या मुलीकडेही लक्ष देता येईल. मितालीने देखील बऱ्याचदा आपल्या आईच्या कष्टांबद्दल उघडपाणे बोलली आहे. मी वेळेवर जेवण केले आहे का नाही, हे पाहण्यासाठी ती दिवस रात्र माझ्यावर देखरेख ठेवायची. मला गरज असेल तेव्हा तिची कमी जाणवू नये, म्हणून तिने नोकरी सोडली. इतकंच नाही तर मितालीने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर सर्वजण कुटुंबाची थट्टा करत असताना त्या खंबीरपणे मैदानावर आपल्या लेकीसोबत उभ्या राहिल्या आणि प्रोत्साहित करायच्या.