हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानात खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात यजमान न्यूझीलंडला टीम इंडियाला विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताने जिंकण्यासाठी किवी संघाला 180 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने केलेल्या 179 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही तितक्याच धावा केल्या आणि समान टाय झाला आणि सुपर ओव्हर खेळण्यात आली. यामध्ये किवी संघाने पहिले फलंदाजी केली आणि 17 धावा केल्या. तर भारतासाठी रोहित शर्माने अखेरच्या चेंडूवर षटकार मारत लक्ष्य पूर्ण केले. रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या.
IND vs NZ 3rd T20I Highlights: सुपर ओव्हरमध्ये जिंकला भारत, न्यूझीलंडमध्ये रचला इतिहास
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddan Park) येथे खेळला जाईल. हा सामना बुधवार, 29 जानेवारी रोजी रात्री 12:30 वाजता खेळला जाईल. तिसरा टी-20 सामना जिंकल्यास न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडिया इतिहास रचेल. या सामन्यात विजयासह भारत न्यूझीलंडच्या भूमीवर किवीविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ असेल. न्यूझीलंडमध्ये खेळत टीम इंडिया आजवर एकही द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकू शकला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात यापूर्वी फक्त दोन द्विपक्षीय टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. या दोन्हीमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, पहिला विजय नोंदविण्याचा यजमान किवी संघाचा मानस असेल. सध्याच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात 7 विकेटने पराभूत करत 2-0 ने आघाडी घेतली. तिसरा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक सामना असल्याने रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे. हा सामन्यातील विजयी संघ मालिका जिंकेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
हॅमिल्टनच्या या मैदानावर आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. न्यूझीलंडने अखेरच्या सामन्यात 20 षटकांत 4 विकेट्स गमावून 212 धावा फटकावल्या आणि येथे त्यांनी भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी केली होती. तसेच ही या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताचा हा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि 2019 विश्वचषकानंतर त्यांनी खेळलेल्या पाचही टी-20 मालिकेत प्रभावी खेळ केला आहे.
असा आहे भारत न्यूझीलंड संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.