IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत, त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका होत आहे. आता त्याची आयपीएल टीम मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आता आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी फक्त दोन महिने उरले आहेत. जगातील या सर्वात मोठ्या लीगची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आपला माजी कर्णधार रोहित शर्माच्या आठवणीत एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबईने रोहित शर्मासोबतच्या त्यांच्या 14 वर्षांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)