सोलापूर एसटी आगारातील एसटी बस चालकाने दाखवलेल्या समयसुचकतेमुळे मोठा अपघात टळला. वैराग ते मोहोळ या मार्गावरील एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्याने एसटी चालकांने बस थेट शेतात नेऊन वेगावर नियंत्रण मिळविले. त्यामुळे जवळपास 70 ते 80 प्रवाशांचे प्राण वाचले. चालकावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
एसटी बसचा अपघात होऊन ४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आजच यवतमाळ येथे घडली होती. त्यानंतर अपघाताची दुसरी घटना होता होता थोडक्यात टळली. चालकाच्या समय सुचकतेमुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. प्रवाशांनीही चालकाला धन्यवाद दिले.
ट्विट
#सोलापूर एसटी आगारातील एसटी बस वैराग ते मोहोळ एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्याने एसटी चालकांने बस थेट शेतात नेऊन वेगावर नियंत्रण मिळविले त्यामुळे जवळपास 70 ते 80 प्रवाशांचे प्राण वाचले pic.twitter.com/lvDtCRxU5V
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)