April Fool's Day | File image

एप्रिल फूल्स डे (April Fool's Day) म्हणजे एखाद्या खास व्यक्तीची टर उडवण्याचा हमखास हक्काचा दिवस. 1 एप्रिल दिवशी मजा मस्तीच्या हेतूने प्रॅन्क करणं, मजेशीर फसवणूक करणं हा प्रकार केला जातो. जगभर हा एप्रिल फूल्स डे असतो. एप्रिल फूल डेचा इतिहास फ्रान्समध्ये 16 व्या शतकाचा आहे. जिथे 1563 मध्ये ट्रेंट कौन्सिलने 1582 मध्ये त्या राष्ट्राने ज्युलियन कॅलेंडरवरून ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये स्विकारावे असा ठराव केला होता. नवीन कॅलेंडर स्वीकारणाऱ्यांपैकी काही लोक १ मार्च किंवा 1 एप्रिल रोजी त्यांचे नवीन वर्ष साजरे करत राहिले, जे विनोदांचा विषय बनले. त्यांना एप्रिल फूल म्हणून संबोधले जात असे आणि अनेक विनोद आणि विनोदांचे लक्ष्य बनले. त्यामुळे 1 एप्रिलच्या निमित्ताने एकमेकांची टर उडवली जाते.

रोजच्या त्याच त्याच कंटाळवाण्या दिवसामधून थोडा ब्रेक म्हणून हा एप्रिल फूल्स डे साजरा केला जातो. मित्रमंडळींसोबत या दिवसाच्या निमित्ताने थोडा आनंद साजरा केला जातो. नक्की वाचा: April Fools' Day Messages In Marathi: एप्रिल फूल्स डे चे मेसेजेस WhatsApp, Facebook, Instagram द्वारा शेअर करा थोडी मित्र-मैत्रिणींची घ्या फिरकी .

एप्रिल फूल्स डे सेलिब्रेशन

April Fool's Day | File image
April Fool's Day | File image
April Fool's Day | File image
April Fool's Day | File image
April Fool's Day | File image

मस्करी मधून आनंद देण्याचा प्रयत्न करा. जीवघेणी मस्करी टाळा. यामधून मस्करीची कुस्करी होईल आणि नकळत गोड नातं तुम्ही कायमचं गमावून बसू शकता.