
जवळच्या लोकांची, मित्र मैत्रिणींची टर उडवण्याचा हक्काचा दिवस म्हणजे 1 एप्रिल. जगभरामध्ये 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स डे (April Fools' Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मज्जा मस्तीच्या उद्देशाने एकमेकांची टर उडवली जाते, त्यांना फसवलं जाऊ शकतं. त्यामुळे या दिवशी जवळच्या मित्र मैत्रींणीपासून अगदीच सुरक्षित राहण्याचा सारेच प्रयत्न करत असतात. आज इंटरनेटच्या जगात काही मजेशीर मेसेजेस पाठवून देखील ही मज्जा मस्ती केली जाते. त्यामुळे 1 एप्रिल च्या दिवशी थोडे विशेष सज्ज रहा.
एप्रिल फूल साजरा करण्याची प्रथा नक्की कधी सुरु झाली याबाबत काही ठोस पुरावे नाहीत. मात्र यामागची एक कथा सांगितली जाते ती म्हणजे, ‘पॉप ग्रेगरी 13 यांनी 1582 मध्ये ज्यूलियन कॅलेंडरऐवजी ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे 1 जानेवारीपासून सुरु होत होते, मात्र त्याआधीपर्यंत नवे वर्ष 1 एप्रिलला साजरे केले जाई. मात्र फ्रांसमधील अनेकांनी हे नवे कॅलेंडर मानण्यास नकार दिला, ज्यांना पुढे ‘एप्रिल फूल’ असे संबोधले जाऊ लागले. पुढे हीच गोष्ट संपूर्ण युरोप व जगभरात पसरली. April 2025 Festival Calendar: एप्रिल महिन्यात राम नवमी, हनुमान जयंतीपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत साजरे होणार 'हे' प्रमुख व्रत आणि सण .
मेसेज 1:
जेव्हा तू आरशा समोर जातोस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful,
पण जेव्हा तु आरशापासून दूर जातोस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Happy April Fool!
मेसेज 2:
FOOL ने
FOOLAN च्या
FOOLWARI मध्ये
FOOL सह शुभेच्छा दिल्या आहेत,
तु सर्वात जास्त
BEAUTIFOOL
WONDERFOOL
आणि ColorFOOL असून
सर्वांमधील FOOL'S आहेस
Happy April Fool's Day!
मेसेज 3:
2 ऑक्टोबर - गांधीजींसाठी
14 नोव्हेंबर : नेहरूंसाठी
15 ऑगस्ट : देशासाठी
1 एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !
Happy April Fool's Day!
मेसेज 4:
मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस, माझ्या जीवनात ही तू आहेस,
आज ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं, ती पण फक्त तूच आहेस
मेसेज 5:
आपली मैत्रीच आहे अशी की
मी हॉट तू कूल
मी एप्रिल (April) आणि तू फूल (Fool)
मेसेज 6:
तू टेन्शनमध्ये असशील, काहीच ठीक होत नसेल तर
तू मला फक्त फोन कर,
त्यानंतर तुझं टेन्शन अधिक वाढवायला मी आहेच…एप्रिल फूल!
आपल्या मित्रांना एप्रिल फुल्ल करण्यासाठी दरवर्षी नवनव्या युक्ता शोधल्या जातात. या गंमतीशीर प्रकारामुळे तणावपूर्ण वातावरण हलकं फुलकं होतं. मज्जा-मस्ती होते. दरम्यान एप्रिल फूल्स डे च्या निमित्ताने मज्जामस्करी नक्की करा पण यामध्ये अगदीचं टोक गाठू नका. मस्करीची कुस्करी होणार नाही ना? याची काळजी घ्या.