April 2025 Festival Calendar (File Image)

April 2025 Festival Calendar: एप्रिल महिना हा सणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात राम नवमी (Ram Navami 2025), हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2025) आणि अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2025) यासारखे मोठे व्रत आणि सण साजरे केले जाणार आहेत. चैत्र नवरात्र (Chaitra Navratri) देखील एप्रिलमध्ये संपेल. वैशाख महिना देखील एप्रिल महिन्यापासून सुरू होतो. वैशाख महिना हा हिंदू कॅलेंडरचा दुसरा महिना आहे. एप्रिलमध्ये कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या दिवशी कोणता सण साजरा केला जाईल ते जाणून घेऊयात.

एप्रिल 2025 च्या उपवास-सणांची यादी -

विनायक चतुर्थी – 1 एप्रिल 2025

राम नवमी – 6 एप्रिल 2025

चैत्र नवरात्र पारण - 7 एप्रिल 2025

कामदा एकादशी - 8 एप्रिल 2025

प्रदोष व्रत - 10 एप्रिल 2025

हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा - 12 एप्रिल 2025

वैशाख महिन्याची सुरुवात - 13 एप्रिल 2025

संकष्टी चतुर्थी - 16 एप्रिल 2025

वरुथिनी एकादशी - 24 एप्रिल 2025

प्रदोष व्रत - 25 एप्रिल 2025

मासिक शिवरात्री – 26 एप्रिल 2025

परशुराम जयंती – 29 एप्रिल 2025

अक्षय्य तृतीया – 30 एप्रिल 2025

राम नवमी 2025 -

चैत्र नवरात्रीचा नववा दिवस रामनवमी म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, हा दिवस दशरथ आणि माता कौशल्याच्या पोटी राम लल्लाचा जन्म झाला होता. रामनवमीच्या दिवशी उपवास करण्याचीही एक मान्यता आहे.

हनुमान जयंती 2025 -

या वर्षी हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला बजरंगबलीची जयंती साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी, बजरंगबलीची पूजा योग्य विधींनी केली जाते.

अक्षय तृतीया 2025 -

दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी, सौभाग्य आणि संपत्ती येते असे म्हटले जाते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकप्रिय समजुतींवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी याबद्दल कोणतीही पुष्टी करत नाही.)