School KID | Instagram

एक शाळकरी मुलगी तल्लीन होत 'इतकी शक्ती हमे न दाता...' गातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात तुफान वायरल झाला आहे. या मुलीच्या निरागसतेने भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांचेही मन जिंकले आहे. अनुराग ठाकूर यांनी इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ शेअर केला आहे.गुजरातच्या सुरत मधील Blue Papillon Preschool मधील विद्यार्थीनीचा हा व्हिडिओ आहे.

शाळेच्या युनिफॉर्म मध्ये अगदी तल्लीन होत आपल्या वर्ग मित्र-मैत्रिणींसोबत ती प्रार्थना गाताना दिसत आहे. या प्रार्थनेच्या वेळेस तिच्या चेहर्‍यावरील हावभाव नेटकर्‍यांना भूरळ पाडून गेले. या मुलीला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर ज्या पालकांचे ध्येय लहान मुलांना आध्यात्मिक तसेच नैतिक शिक्षण मिळावे हे आहे. त्यांना आनंद झाल्याचं चित्र आहे.

वायरल व्हिडिओ

दरम्यान या चिमुकलीच्या व्हिडिओला खासदार अनुराग ठाकूर यांनी शेअर केल्यानंतर त्यावर मुलीच्या वडिलांनीही पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत. गाण्यादरम्यान अनेक युजर्सनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, कारण ते त्यांना त्यांच्या शाळेच्या दिवसांमध्ये परत घेऊन गेले. एका यूजरने  म्हटले, "खूप गोड! भगवान हमेशा बच्चे को राखे." दुसऱ्या यूजरने म्हटले, "शाळेच्या वेळेची प्रार्थना, आठवली." अजून एका युजरने "भक्तीने गोड गोड लिल ग्रल." अनेक इंस्टाग्राम यूजर्सनी मुलीच्या निरागसतेचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि तिच्या आवाजावर "दैवी" आणि "आत्म्याला स्पर्श करणारा" अशी टिप्पणी केली. काहींनी लिहिले की, हा व्हिडिओ पाहून त्यांना रडू आले कारण तो त्यांना त्यांच्या विश्वासाची, शक्तीची आणि सकारात्मकतेची आठवण करून देतो. इतरांनी लहान मुलांमध्ये नैतिक मूल्ये आणि अध्यात्म जोपासल्याबद्दल शाळांचे कौतुक केले.