
Imran Khan Nominated For Nobel Peace Prize: भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Pakistan Prime Minister Imran Khan) यांना मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी केलेल्या संघर्षांसाठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन (Nomination for the Nobel Peace Prize) देण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्थापन झालेल्या पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (PWA) या वकिली गटाच्या सदस्यांनी इम्रान खान यांच्या नामांकनाची घोषणा केली.
पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (PWA) आणि नॉर्वेजियन राजकीय पक्ष सेंट्रम यांनी यासंदर्भात घोषणा केली. पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (PWA) हा एक वकिली गट आहे, जो डिसेंबर 2023 मध्ये स्थापन झाला. ही संघटना नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टी सेंट्रमशी संलग्न आहे. पार्टी सेंट्रमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा -Imran Khan यांच्यानंतर निकटवर्तीय रमीज राजा PCB अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, ‘ही’ व्यक्ती बोर्ड प्रमुख बनण्याचा प्रमुख दावेदार - Report)
पार्टी सेंट्रमने रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आम्हाला पार्टीट सेंट्रमच्या वतीने हे जाहीर करताना आनंद होत आहे की, नामांकन करण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत युती करून माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानमध्ये मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी केलेल्या कार्यासाठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.' (हेही वाचा - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांना Cipher Case प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास)
2019 मध्ये देखील मिळाले होते नामांकन -
दरम्यान, 2019 च्या सुरुवातीला, दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसाठी इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. दरवर्षी, नॉर्वेजियन नोबेल समितीला शेकडो नामांकने मिळतात, त्यानंतर ते 8 महिन्यांच्या प्रक्रियेद्वारे विजेत्याची निवड करतात.
इम्रान खान सध्या तुरुंगात -
पाकिस्तानच्या मुख्य विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक असलेले इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एप्रिल 2022 मध्ये अविश्वास प्रस्तावानंतर इम्रान खान यांना सत्तेतून काढून टाकण्यात आले.