
Who is Ashwani Kumar?: अश्वानी कुमार (Ashwani Kumar) आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात मोठी कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. लीगच्या 17 वर्षांच्या इतिहासात पदार्पणात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तो चौथा गोलंदाज आणि पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. जर आपण आयपीएल पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांबद्दल पाहिले तर अश्वनी चौथ्या स्थानावर आहे. या यादीत सर्वात वर अल्जारी जोसेफ आहे. त्याने 2019 मध्ये हैदराबादविरुद्ध पदार्पण केले होते. मुंबईसाठी (Mumbai Indians) आयपीएल पदार्पणात जोसेफने 12 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. या यादीत दुसऱ्या स्थानावर अँड्र्यू टाय आहे, ज्याने 2017 मध्ये पदार्पणात 17 धावा देऊन 5 बळी घेतले होते.
आयपीएल पदार्पणातील सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी
6/12 - अल्झारी जोसेफ (मुंबई) विरुद्ध एसआरएच, 2019
5/17 - अँड्र्यू टाय (गुजरात) विरुद्ध आरपीएस, 2017
4/11 - शोएब अख्तर (कोलकाता) विरुद्ध दिल्ली, 2008
4/24 - अश्वनी कुमार (मुंबई) विरुद्ध केकेआर, 2025
4/26 - केव्हॉन कूपर (राजस्थान) विरुद्ध केएक्सआयपी, 2012
4/33 - डेव्हिड विसे (बेंगळुरू) विरुद्ध एमआय, 2015
अश्वनी कुमार कोण आहे?
मुंबईचा 23 वर्षीय मध्यमगती गोलंदाज अश्वानी कुमार टी-20 लीगचा एक मोठा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. मोहाली येथील अश्वानी कुमार हा एक अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटू मानला जातो. विशेषतः तो त्याच्या गोलंदाजी क्षमतेसाठी ओळखला जातो. अश्वानी हा मध्यमगती गोलंदाज आहे. अश्वानी कुमारने कोलकात्याच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून तो विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत आहे. अश्वानी ने पंजाबसाठी 2 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3 आणि 4 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. शेर-ए-पंजाब स्पर्धेत प्रसिद्धी मिळवल्यानंतर, तो मुंबईच्या स्काउट संघाच्या नजरेत आला. 2025 च्या आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांत खरेदी केले.